Pune Video : सोशल मीडियावर पुण्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. पुण्यातील अनेक गोष्टी लोकप्रिय आहे. पुणेरी भाषा, पुणेरी पाट्या, वास्तू, मंदिरे, गडकिल्ले, पेठ्या इत्यादी. त्याचप्रमाणे पुण्यातील पीएमटी सुद्धा लोकप्रिय आहे. पुण्यातील पीएमटी बसने दररोज हजारो लोक प्रवास करतात. पीएमटीमधील गमती जमती, भांडण, किस्से सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भर रस्त्यात दोन पीएमटी बसची टक्कर झालेली दिसत आहे. (Pune video PMT Bus Drivers Reckless driving : PMT buses colliding on the highway)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दोन पीएमटी बस दिसेल. या पीएमटी बस एकापाठोपाठ एकमेकांना धडकल्या आहेत. पुढील पीएमटीला मागून येणाऱ्या पीएमटीने धडक दिली आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की बसजवळ बस ड्रायव्हर, कंडक्टर आणि इतर लोक जमलेले आहेत. पुढे व्हिडीओत तुम्हाला मागून धडक दिलेली बस वाघोली ते स्वारगेट मार्गावर जाणारी दिसेल. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. पीएमटीची एसी बस अतिशय वेगाने चालवतात, त्यामुळे ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

_punethings या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “येरवडा मेट्रो स्टेशन जवळ दोन PMPML बस चा झाला अपघात. ” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप घाई असते यांना” तर एका युजरने लिहिलेय, “लहान मेट्रो केली राव” आणखी एका युजरने लिहिलेय, “पीएमटी बसचालकांना एवढी कोणती घाई असते?”

यापूर्वी सुद्धा पीएमटी बसचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. अनेकदा लोक पीएमटी बसवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसून येतात. विशेषत: एसी बस चालक अंगावर गाडी आणेल की काय इतक्या वेगाने चालवात आणि जोराने ब्रेक दाबतात, अशा तक्रारी लोक सोशल मीडियावर करताना दिसून येतात.