Pune video : पुण्यातील पीएमटी बसचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. पीएमटी बसमधील कधी भांडणाचे व्हिडीओ तर कधी भन्नाट गमती जमतीचे व्हिडीओ व्हायरल होतात. कधी पीएमटी चालक कंडक्टरचे रील्स व्हायरल होताना दिसतात तर कधी प्रवासी पीएमटी बसमधील आपला अनुभव सांगत किंवा मजेशीर किस्से सांगत व्हिडीओ शेअर करताना दिसतो. सध्या पीएमटीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ फुरसुंगी पॉवर हाऊस बस स्टॉपजवळील आहे. व्हिडीओत तु्म्हाला दिसेल की उष्णतेमुळे टायरने पेट घेतला. नेमके काय घडले, जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला पीएमटी बस दिसेल. या बसच्या टायरने पेट घेतलेला दिसत आहे आणि काही लोक ही आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे. या पीएमटीभोवती अनेक लोक जमा झालेली दिसत आहे. ट्रॅफिक पोलीस सुद्धा या ठिकाणी सुद्धा दिसत आहे.

फुरसुंगी पॉवर हाऊस बस स्टॉपजवळील ही घटना आहे. पीएमटी बसला ब्रेक लाइनर गरम झाल्यामुळे स्पार्क झाला आणि उष्णतेमुळे टायरने पेट घेतला पण चालकाच्या सतर्कतेमुळे आग वेळीच विझवण्यात आली व सर्व प्रवासी सुरक्षित बाहेर पडले.

पाहा व्हायरल व्हिडीओ

vishwajit_dada_gaikwad या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “सध्या प्रचंड उष्णता आहे, कृपया स्वतःची आणि आपल्या वाहनांची काळजी घ्या! इलेक्ट्रिक वाहनांचे, कार, दुचाकी आणि टायरची नियमित तपासणी करा. गाडी उष्ण ठिकाणी जास्त वेळ पार्क करू नका.कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत शांत राहून सुरक्षितता बाळगा. आपली काळजी आपल्या कुटुंबासाठी महत्त्वाची आहे!”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “वेळेवर बघत नाही ना ते असं होतं मग कशी पण पाहायची, मेन्टेनन्स नाही करायचा मग असं काहीतरी होतं. फुकटची भेटली म्हणून कशी पण पळवली” तर एक युजर लिहितो, “तुम्हाला रोज कुठे ना कुठे PMT बंद पडलेली दिसेल. देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष द्यायची गरज आहे पुणे PMT वर” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी चालकाचे कौतुक केले आहे.