Pune Video : गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण आहे. भारताच्या इतर काही भागांमध्ये सुद्धा हा सण साजरा केला जातो. लोकमान्य टिकाळांनी लोकांमध्ये एकता निर्माण करण्यासाठी सार्वजानिक गणपती उत्सव साजरा करणे सुरू केले आणि हीच परंपरा जपत दरवर्षी गणेशोत्सव आवडीने साजरा केला जातो. (Pune Video New Sangavi : Police got the honor of Aarti in ganeshotsav)

गणेशोत्सव हा फक्त उत्सव नसून मराठी संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. या उत्सवादरम्यान ढोल ताशाचा गजर सगळीकडे ऐकायला मिळतो. ठिकठिकाणी गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते त्यामुळे जिकडे तिकडे गर्दी दिसून येते.

amazon prime comedy movie
‘चुपके चुपके’ ते ‘वेलकम’ प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे ‘हे’ गाजलेले विनोदी सिनेमे, पाहा यादी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Shocking video pune A Guy in Car attacked by 3 Youths on Scooter Pune street video goes viral
पुण्यात गुंडगीरी संपेना; कार चालकाचा पाठलाग केला शिवीगाळ केली अन्…VIDEO पाहून तुम्हीच सांगा या तरुणांचं करायचं काय?
Shiva
Video : “ही लग्नाची पत्रिका…”, शिवाला आशूच्या लग्नाचे आमंत्रण मिळणार अन्….; पाहा मालिकेचा प्रोमो
Paaru
Video: “देवीआईंनासुद्धा कळायला पाहिजे…”, पारू अनुष्काचे सत्य अहिल्यादेवीसमोर आणणार? मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Pandit Vishnu Rajoria on 4 Children
Video: ‘चार मुलांना जन्म द्या, एक लाख रुपये मिळवा’, ब्राह्मण जोडप्यांसाठी परशुराम मंडळाच्या अध्यक्षांची ऑफर
Shiva
Video : “तू दे होकार, मला तेच…”, आशूची नाराजी दूर करण्याची शिवाची हटके स्टाईल; मालिकेत पुढे काय होणार?
Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक

हेही वाचा : यालाच म्हणतात,”मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…!”, दिव्यांग मित्राच्या मदतीला धावून आला चिमुकला, निस्वार्थ मैत्रीचा Video Viral

गणेशोत्सवात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे महत्त्वाचे काम पोलीस करतात. वाहतुक कोंडी होऊ नये, नियमांचे उल्लंघन होऊ नये, मिरवणूक किंवा विसर्जनादरम्यान गैरवर्तन होऊ नये म्हणून पोलीस दिवसरात्र काम करतात. अहोरात्र भाविकांसाठीच राबणाऱ्या या पोलीसांना मात्र गणपतीचे नीट दर्शनसुद्धा घेता येत नाही.
सध्या पुण्यातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओने सर्वांचे मन जिंकले आहे. या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की अहोरात्र भाविकांसाठी राबणाऱ्या पोलिसांना गणरायाच्या आरतीचा मान मिळाला आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ

हा व्हायरल व्हिडीओ नवी सांगवीतील विसर्जनाच्या मिरवणुकीतला आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की मिरवणुकीत आरती सुरू आहे आणि पोलिसांना या आरतीचा मान मिळाला आहे. सहसा गणेशोत्सवादरम्यान आपण पोलिसांना शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी धडपड करताना बघतो पण या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की गणेशोत्सवात दिवसरात्र राबणाऱ्या पोलिसांना गणरायची आरती करण्याचा योग आला. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल. लोकांचे रक्षण करणारे पोलीस आपल्याला कधीही लक्षात राहत नाही. नेते, सेलिब्रिटींच्या हातून आरती होत असलेले अनेक व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असेल पण हा व्हिडीओ त्या सर्वांपेक्षा हटके आहे.

हेही वाचा : ‘गावरान तडका…’ शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांनी धरला हलगीच्या तालावर ठेका; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “कोल्हापुरातील हलगी डान्स…”

आरती करणारे पोलीस हे वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश कसबे आहेत आणि ते चैत्रबन मित्र मंडळाच्या गणपतीची आरती करत आहे. या गणपतीला नवी सांगवीचा महाराजा सुद्धा म्हणतात.

Story img Loader