Viral Video : पुणे हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध शहरांपैकी एक आहे. या शहराचा इतिहास या शहराची ओळख सांगतो. येथील प्रत्येक गोष्ट चर्चेत येते. मग ऐतिहासिक वास्तू असो किंवा प्राचीन मंदिरे, पुणेरी मिसळ असो वा पुणेरी भेळ, पुणेरी भाषा असो किंवा पुणेरी पाट्या नेहमी चर्चेत असतात. पुण्यातील पीएमटी सुद्धा चर्चेचा विषय ठरते. पीएमटीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेकदा कोणत्याही ठिकाणचे व्हिडीओ पुण्यातील व्हिडीओ समजून चर्चेत येतात सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक बस दाखवली आहे. व्हिडीओत तुम्हाला असे काही मजेशीर दिसून येईल की तुम्हाला हसू आवरणार नाही.
दररोज हजारो लोक बसने प्रवास करतात. विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंत अनेक जण शहरात फिरण्यासाठी बसचा वापर करतात. अनेकदा बसमध्ये भयानक गर्दी दिसून येते. कधी कधी एवढी गर्दी असते की पाय ठेवायला सुद्धा जागा राहात नाही. तरीसुद्धा काही लोक अशा गर्दीत बसमधून प्रवास करतात.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला प्रवाशांनी गच्च भरलेली बस दिसून येईल. या बसमधील गर्दी पाहून तुम्हीही डोकं धराल. व्हिडीओ तुम्हाला काही लोक बसमधून उतरताना दिसेल. तितक्यात तुमचं लक्ष एका तरुणाकडे जाईल. हा तरुण बसमधून उतरत आहे आणि त्याच्या हाती चक्क हँडल आहे. बसमध्ये उभे राहण्यासाठी ज्या हँडलचा उपयोग केला जातो, ते हँडल घेऊन हा तरुण फिरतोय. या तरुणाला बघून सर्व जण हसताना दिसत आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “आता काहीजण बोलतील हा व्हिडीओ पुण्यातला नाही!”
हा व्हिडीओ खरंच पुण्यातील नाही. पण पुण्यात अशा अनेक गमती जमती घडतात त्यामुळे अनेकदा काही व्हिडीओ पुण्यातील असल्याचा दावा करून सोशल मीडियावर शेअर केले जातात.
पाहा व्हायरल व्हिडीओ
हेही वाचा : काय चूक होती त्याची? ‘कांतारा‘ सिनेमा पाहून जोरात ओरडला अन् आईने धोपटला; VIRAL VIDEO पाहून हसाल पोट धरून
pune_trending_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुण्याच्या नावाने काहीही खपवतात” तर एका युजरने लिहिलेय, “जय हो प्रभू” काही युजर्सनी या व्हिडीओवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.