Pune Viral Video : पुण्यातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही व्हिडिओ थक्क करणारे असतात. पुणेरी पाट्या, पुणेरी गोष्टी एवढेच काय तर पुणेरी लोकांचे सुद्धा अनेक व्हिडिओ चर्चेचा विषय ठरतात. पुण्यात ट्रॅफिक हा खूप मोठा विषय आहे. वाहनांचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी पुण्याच्या काही भागांमध्ये पीएमटीच्या बससाठी एक विशेष रस्ता (लेन) देण्यात आला आहे आणि या पीएमटीच्या बसेस याच रस्त्यावरूनच येणे जाणे करतात.
सध्या एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे की ज्यामध्ये पीएम पीएमटीच्या लेनमध्ये उलट दिशेने लोक येत आहेत आणि बसचालक मात्र त्या नियम मोडणाऱ्या लोकांसाठी बस मागे घेऊन जाताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

पीएमटीच्या बससमोर बेशिस्त दुचाकी चालकांचा शिरजोर

police action against handcart pullers and auto driver for blocking roads and footpaths in dombivli
डोंबिवलीत रस्ते, पदपथ अडविणाऱ्या हातगाडी, रिक्षा चालकांवर कारवाई, नागरिकांनी व्यक्त केले समाधान
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
Kurla Bus Accident: Amid Probe, Viral Video Shows Another BEST Driver Buying Liquor From Wine Shop In Mumbai's Andheri shocking video viral
मुंबईत हे काय चाललंय? बेस्ट चालकाने बस थांबवली, वाईन शॉपवरुन दारु घेतली; कुर्ला अपघातानंतर दुसरा धक्कादायक VIDEO व्हायरल
Uber driver gets review as a good kisser from customer post viral on social Media
“चांगला किस करणारा”, ड्रायव्हरचा असा रिव्ह्यू तुम्ही कधीच ऐकला नसेल, ‘या’ व्हायरल पोस्टमध्ये नेमकं आहे तरी काय
Vasota Jungle Trek
मरणाची गर्दी! वासोटा ट्रेकला जाण्यापूर्वी हा VIDEO एकदा पाहाच
Funny video Drunk man doing dance at a haladi ceremony funny video viral social media
देशी दारु अशी चढली की…हळदीला भर मांडवात काकांनी काय केलं पाहा; कोकणतल्या हळदीचा Video पाहून पोट धरुन हसाल
filght Footage
विमानात नको त्या अवस्थेत सापडले जोडपे! Video झाला व्हायरल, क्रू सदस्यांची चौकशी सुरू, नेटकऱ्यांचा संताप

या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला पीएमटीची एक बस दिसेल. या बसचा क्रमांक ३४८ आहे. या बसवर लिहिलेय, “निगडी औंध मार्गे पुणे स्टेशन”. व्हिडिओत तुम्हाला दिसेल की बस त्याच्या लेनमधून जात आहे पण लोक मात्र वाहतुक नियम मोडत या लेनमध्ये शिरले आणि बसच्या विरुद्ध दिशेने येताना दिसतात. समोरून येणाऱ्या दुचाकी पाहून बस मागे जाते. खरं तर पुणेकर लोक नियम मोडत आहे पण तरीसुद्धा पीएमटी बसचालक शांतपणे बस मागे घेऊन जाताना दिसतोय. व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, “पुणेकर कधी सुधरणार?”

हेही वाचा : ‘अंगात नाही बळ अन् चिमटा काढून पळ…’ बैलाला लाल कपडा दाखवणं पडलं महागात… VIDEO चा शेवट पाहून अंगावर येईल काटा

पाहा व्हायरल व्हिडीओ (Video Viral)

हेही वाचा : VIDEO: एक चूक महागात पडू शकते! खिडकी उघडून बसमध्ये शिरत होता बिबट्या, तेवढ्यात पर्यटकांनी पाहिलं अन्.., शेवट एकदा पाहाच

welovepune_official या इन्स्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुणे तिथे काय उणे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, ” रस्ते कितीही मोठे करा जोपर्यंत लेनचे नियम स्ट्रीक होणार नाही, रस्ते कमीच पडणार” तर एका युजरने लिहिलेय, “बस वाल्याची चूक नाही,टू व्हीलरवाले चुकीच्या लेनमध्ये घुसलेत.” आणखी काही युजरने लिहिलेय, “लाज वाटली पाहिजे, अभिमान कसला बाळगत आहात.” अनेक युजर्सनी संताप व्यक्त केला आहे

Story img Loader