Pune Video : पुणे शहराला अनेक नावाने ओळखले जाते. ऐतिहासिक शहर, सांस्कृतिक शहर, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचे माहेरघर इत्यादी नावाने पुण्याला संबोधतात. पुण्यातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. कधी येथील ऐतिहासिक वास्तू तर कधी प्राचीन मंदिरे, कधी येथील खाद्यसंस्कृती तर कधी पुणेरी पाट्या चर्चेत येतात. पुणेकरांचे अनेक मजेशीर व्हिडीओ सुद्धा समोर येतात. काही व्हिडीओ पाहून तर पोट धरून हसायला येते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका स्कुटीवर तीन तरुण बसलेले दिसत आहे आणि हे तरुण पावसापासून वाचण्यासाठी मोठी छत्री डोक्यावर धरुन जात आहे. त्यांची छत्री पाहून कोणीही अवाक् होईल. त्यांची छत्री एवढी मोठी आहे की त्यांची स्कुटीसुद्धा भिजणार नाही. सध्या व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक दुचाकी दिसेल. या दुचाकीवर तीन तरुण ट्रिपल सीट बसलेले दिसत आहे. सध्या पुण्यात पावसाचा जोर वाढला आहे. सगळीकडे पाऊस पडत आहे. अशा वातावरणात पावसापासून वाचण्यासाठी या पुणेकर तरुणांनी अनोखा जुगाड शोधला आणि चक्क मोठी छत्री डोक्यावर घेतली. आता तु्म्हाला वाटेल पावसात छत्री वापरणे, ही तर खूप साधी गोष्ट आहे पण हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला कळेल की या तरुणांनी वापरलेली छत्री ही गाडीसुद्धा भिजणार नाही, एवढी मोठी आहे. या वाढीव पुणेकरांचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Really last digit of your mobile number tell about your nature and personality
तुमच्या मोबाईलचा शेवटचा अंक खरंच सांगतो तुमचा स्वभाव? सोशल मीडियावर VIDEO चर्चेत
Man wrote message for his wife in back of the car video goes viral
किती ते प्रेम! नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून कराल कौतुक
constable commits suicide marathi news
पुणे: महिला पोलीस शिपायाची इंद्रायणी नदीत उडी; तरुणाने वाचवण्याचा प्रयत्न केला पण…
Be careful while parking bike scooty on the road shocking video goes viral on social media
तुम्हीही रस्त्यावर तुमची बाईक, स्कूटी पार्क करुन जाता का? हा VIDEO बघून धक्का बसेल; पाहा तरुण थोडक्यात कसा वाचला
Puneri pati viral for parking in his spot funny puneri pati goes viral
PHOTO: पुणेकरांचा नाद नाय! गेट समोर गाडी पार्क करणाऱ्यांना आकर्षक बक्षिसे; शेवटचं बक्षिस वाचून पोट धरुन हसाल
Pakistan International Airlines Flight
पाकिस्तानच्या विमानाने तुम्ही कधी प्रवास केलाय का? प्रवाशाने शेअर केलेला Video पाहून तुमचीही झोप उडणार!

हेही वाचा : “लग्न ही अशी जखम…” पठ्ठ्यानं गाडीच्या मागे लिहिलं असं काही की PHOTO पाहून पोट धरुन हसाल

पाहा व्हायरल व्हिडीओ

rutik_jagtap_2005 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “प्रॉपर पुणेकर”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “या छत्रीखाली अजून चार गाड्या जातील.” तर एका युजरने लिहिलेय, “MH 12 चा नाद नाही करायचा” आणखी एका युजरने लिहिलेय, “पुणे पोलीस तुमचा पत्ता विचारत आहे” अनेक युजर्सना हा व्हिडीओ आवडला असून काही युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

यापूर्वी अनेकदा सोशल मीडियावर पुण्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. पुण्यातील अनेक गमती जमती तसेच मजेशीर पाट्या व्हायरल होत असतात. याशिवाय अनेक पुणेकर मजेशीर व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर लोकांचे मनोरंजन करताना दिसतात.