Pune Viral Video : पुणे हे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक शहर आहे. या शहराला सांस्कृतिक वारसा लाभला आहे. शिक्षणाचे माहेरघर असलेले पुणे कधी पुणेरी पाट्यांमुळे तर कधी येथील ऐतिहासिक वास्तूंमुळे चर्चेत येते. सध्या पुणेरी पाट्यांचे नाही तर एका पुणेरी पोस्टरचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. या पोस्टरवर १८,१९, २० जानेवारी, सायंकाळी ६ ते ९ पुण्यातील किमान एक लाख मोबाईल स्विच ऑफ होतील, असे सांगितले आहे. सध्या हे पोस्टर सगळीकडे व्हायरल होत आहे. या पोस्टरमुळे पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक पोस्टर दिसेल. या पोस्टरवर “१८,१९, २० जानेवारी, सायंकाळी ६ ते ९ पुण्यातील किमान एक लाख मोबाईल स्विच ऑफ होतील” असे लिहिलेय. विशेष म्हणजे या पोस्टरच्या खाली कोणत्याही कंपनीचे नाव नाही किंवा कोणतेही कारण लिहिलेले नाही. त्यामुळे हे पोस्टर का लावले आहे आणि खरंच पुणेकरांचे मोबाईल फोन स्विच ऑफ होणार का, असा प्रश्न सर्वांना पडलाय. हे पोस्टर फक्त एका ठिकाणी नाही तर पुण्यात अनेक ठिकाणी लावले आहे.
१८,१९, २० तारखेला खरंच पुणेकरांचे मोबाईल फोन स्विच ऑफ होणार?
१८,१९, २० तारखेला खरंच पुणेकरांचे मोबाईल फोन स्विच ऑफ होणार का, असा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल पण टेन्शन घेऊ नका, असे काहीही होणार नाही. या पोस्टरमागील आता खरे कारण समोर आले आहे. असेच एक पोस्टर पुन्हा व्हायरल होत आहे. या पोस्टरमवर लिहिलेय, “१८,१९, २० जानेवारी, सायंकाळी ६ ते ९ … किमान १ लाख पुणेकर मोबाईल बंद करुन स्वत:शीच संवाद साधतील. डॉ. कुमार विश्वास… श्री राम ऊर्जा कानावर… मनावर!”
आणखी असेच एक पोस्टर समोर आले आहेत. या पोस्टरमध्ये स्पष्टपणे सांगितले की १८,१९, २० तारखेला डॉ. कुमार विश्वास हे श्री रामाबद्दल संवाद साधतील.या सर्व पोस्टरचे सुद्धा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचा : याला म्हणतात संस्कार! श्लोक ऐकल्याशिवाय चक्क कुत्रा अन्नाचा एक कण सुद्धा खात नाही, व्हायरल होतोय व्हिडीओ
me_ashi_kashi या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हे सर्व व्हिडीओ शेअर करण्यात आले आहे. या अकाउंटवर सुरुवातीला पुणेकरांचे मोबाईल फोन स्विच ऑफ होणार असल्याचे पोस्टर शेअर केले होते. त्यानंतर नवीन व्हिडीओमध्ये त्यामागील कारण सुद्धा सांगत नवीन पोस्टर दाखवले आहेत. या व्हिडीओवर पुणेकरांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सुरुवातीला व्हिडीओ पाहून अनेक पुणेकर घाबरले होते पण नंतर कारण सांगितल्यानंतर एका युजरनी लिहिलेय, “मार्केटिंग स्ट्रॅटेजी” तर एका युजरने विचारले आहेत, “हा कार्यक्रम कुठे आहे?”