Pune Viral Video : पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हटले जाते. पुणे शहराचा इतिहास, संस्कृती, ऐतिहासिक वास्तू, प्राचीन मंदिरे, पुणेरी पाट्या, पुणेरी भाषा आणि खाद्यसंस्कृती नेहमी चर्चेचा विषय ठरतात. पुण्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी कोणी पुण्यातील त्यांचे अनुभव शेअर करतात.
सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आप पक्षाचे उपाध्यक्ष श्री निलेश मनोहर वांजळे यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी बस चालकाला बसस्टॉप वर बस कडेला लावण्याची विनंती केली आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (Pune Viral Video of PMT Buses)
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की पीएमटीची बस दिसेल बसचालकाने बसस्टॉपवर बस कडेला न लावल्यामुळे एका चारचाकीचा अपघात झाला आहे. या व्हिडिओत तुम्हाला दिसेल की आप पक्षाचे उपाध्यक्ष श्री निलेश मनोहर वांजळे बस चालकांना विनंती करतात की बसस्टॉपवर बस कडेला लावा जेणेकरून इतर वाहनांना जायला रस्ता मिळेल. हा व्हिडीओ पुण्यातील धनगर बाबा बसस्टॉप येथील NDA रोडवरील आहे. हा व्हिडीओ खूप जुना आहे, जो सध्या पुन्हा व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
aapala_nilesh_wanjale या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “दुपारी धनगर बाबा बसस्टॉप,NDA रोड वर अचानकपणे थांबलेल्या बसला चारचाकी गाडीचा धडकून अपघात झाला.त्यामुळे सर्व बस ड्रायव्हर दादांना विनंती बसस्टॉप वर बस कडेला लावत जावा आणि अपघात टाळा. तुमच्या ओळखीच्या बस ड्रायव्हर ला नक्की शेअर करा.
आपलाच –
श्री निलेश मनोहर वांजळे
उपाध्यक्ष, आप- पुणे.”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “सगळ्या बसस्टॉपवर रिक्षावाले जास्ती करून शेअर रिक्षा वाले थांबलेले असतात. बस वाला तरी कुठे गाडी थांबवणार बस.” तर एका युजरने लिहिलेय, “मागच्या गाड्या पुढे जाऊ नये म्हणून ते असं करतात माझ्याबरोबर खूपदा झालंय असं…”आणखी एका युजरने लिहिलेय, “पीएमटी म्हणजे रोडवरचा यमराज”