Pune Viral Video : पुणे हे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक शहर आहे. येथील अनेक ठिकाणे अतिशय लोकप्रिय आहे आहेत. दरवर्षी हजारो लोक पुणे दर्शनाला येतात येथील ऐतिहासिक वास्तू, प्राचीन मंदिरे बघायला गर्दी करतात. पुण्यात येणारा प्रत्येक व्यक्ती येथील एका मंदिराला भेट द्यायला विसरत नाही. ते मंदिर माझे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर. पुण्यातील या अतिशय लोकप्रिय गणपतीच्या मंदिरात प्रत्येक सणाला आकर्षक सजावट दिसून येते. सध्या दिवाळी सुरू आहे. सगळीकडे दिवाळीची जय्यत तयारी सुरू आहे. अशात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंदिराचा सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये हे गणपतीचे मंदिर अतिशय सुंदररित्या सजवलेले दिसत आहे. या मंदिराची दिवाळी सजावट पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला मंदिराचा परिसर दिसेल. या मंदिराच्या अवतीभवती लाइटिंग, दिव्यांची आकर्षक सजावट केलेली दिसेल. या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की हे गणपतीचे मंदिर अतिशय सुंदर दिसत आहे. गणपतीची मूर्ती सुद्धा इतकी विलोभनीय दिसत आहे की तुमची नजर हटणार नाही. या मंदिराच्या अवतीभोवती काही देखावे सादर केले आहे. तुम्हाला या व्हिडीओमध्ये गायीचा देखावा दिसेल. शंकर पार्वती आणि गणपतीची मूर्ती सुद्धा दिसेल. मंदिराच्या चारही बाजूने सुंदर आकाश कंदील लावलेले आहे. मंदिराचा हा सुंदर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून तुम्हाला एकदा तरी या मंदिराला भेट द्यावीशी वाटेल.
पाहा व्हायरल व्हिडिओ (Viral Video)
Punekar_ig या इन्स्टाग्राम अकाउंट करून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती दिवाळी सजावट”
हेही वाचा : असे मित्र कुठे भेटतात यार? मैत्रिणीला वाढदिवसाला दिलं असं सरप्राईज की… VIRAL VIDEO पाहून व्हाल थक्क
या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, ” माझा बाप्पा किती गोड दिसतो. माझा मोरया किती छान दिसतो” तर एका युजरने लिहिलेय, ” हीच पुण्याची खासियत आहे. इथे प्रत्येक सण खूप उत्साहात साजरा केला जातो.” काही युजरने हार्टचे इमोजी शेअर केले आहे तर काही युजरने दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.”