Pune Viral Video : ‘पुणे तिथे काय उणे’हे म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल. या म्हणीचा अर्थ आहे -“असं काही नाही जे पुण्यात नाही म्हणजेच पुण्यात सर्वकाही आहे” अनेकदा या म्हणीचा बोलताना किंवा लिहिताना वापर केला जातो. सध्या एक असाच पुण्यातील व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला ही म्हण पुन्हा आठवेल. नेमके काय आहे या व्हिडीओमध्ये, जाणून घेऊ या. (pune video smart Punekar extra Enthusiasts meet here Punekar person decorated car with lighting video goes viral)

एवढे उत्साही लोक फक्त पुण्यातच भेटतात

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला पुण्यातील एफसी (फर्ग्युसन कॉलेज) रोड दिसेल. या रोडवर एक कार उभी आहे आणि ही कार खूप सुंदररित्या सजवली आहे. विशेष म्हणजे ही कार फुलाने नाही तर चक्क लाइटिंगने सजवली आहे. या कारवर रंगबेरंगी लाइट लावले आहे. रस्त्यावर उभी असलेली ही कार दिवाळीच्या सणामध्ये येणार्‍या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “पुणे तिथे काय उणे”

Sharad Pawar on Jarange Patil
Sharad Pawar : मनोज जरांगेंनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “मला आनंद, कारण…”
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Vulgar Dance in Mangesh Kudalkar Election Campaign
Vulgar Dance In Election Campaign : मंगेश कुडाळकरांच्या प्रचारात अश्लील नाच, व्हायरल व्हिडीओवर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने केला ‘हा’ आरोप
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : ‘जे बाळासाहेबांचे झाले नाहीत, ते राज ठाकरेंचे काय होणार?’, राजू पाटलांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका
Uddhav Thackray Warns to Independent Candidates to take Back The Name
Uddhav Thackeray : “अपक्ष किंवा बंडखोरांनी अर्ज मागे घेतले नाहीत तर…”, उद्धव ठाकरेंचा इशारा

हेही वाचा : गावच्या महिलेचा ‘आंखों में कजरा बालों में गजरा’ गाण्यावर तुफान डान्स; एखाद्या हिरोईनलाही जमणार नाही अशी स्टेप; VIDEO एकदा बघाच

पुण्यातील असे अनेक भन्नाट व्हिडीओ दरदिवशी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पुण्यातील पाट्या, प्रसिद्ध खाद्यपदार्यांचे ठिकाणे, ऐतिहासिक वास्तू, इत्यादी गोष्टींचे व्हिडीओ लोक आवडीने सोशल मीडियावर शेअर करतात.

/

/

u

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video

pune_tour_12 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “वाढीव पुणेकर”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “धानोरी भागात ही गाडी 5 दिवस झाले दिसत आहे” तर एका युजरने लिहिलेय, “बाहेरून पुण्यात आलेली कार” आणखी एका युजरने लिहिलेय, “अति उत्साही कलाकार” अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

हेही वाचा : “क्षणभराचा राग अन् आयुष्यभर पश्चाताप” फटाके फोडण्यावरून शेजारी भिडले, थेट छतावरून सिलेंडर फेकला; VIDEO व्हायरल

काही दिवसांपूर्वी अशीच एक लाइटिंग लावलेली कार रस्त्यावर धावताना दिसली होती. त्या कारचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. अनेक लोकांना त्या कारचे फोटो आणि व्हिडीओ काढले होते आणि सोशल मीडियावर शेअर केले होते.