Pune Viral Video : पुणे हे ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. पुण्यातील ऐतिहासिक वास्तू, प्राचीन मंदिरे, गडकिल्ले या शहराचा इतिहास सांगतात. दर दिवशी पुणे शहर बघायला हजारो लोक येतात. येथील गणेशोत्सव विशेष आकर्षणाचे केंद्रबिंदु असते. गणेशोत्सवा दरम्यान ढोलताशाची जुनी व सुंदर परंपरा येथे पाहायला मिळते. गणेशोत्सवा दरम्यान ढोल ताशाचा आवाज ज्याच्या कानी पडला नाही, असा क्वचितच कोणी असेल. जागोजागी ढोलताशा आणि एकच गर्दी दिसून येते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की रस्त्यावर ढोल ताशांचा गजर सुरू आहे आणि अचानक तिथे रुग्णवाहिका येते तेव्हा पुढे काय घडते, एकदा व्हिडीओ पाहाच.
हा व्हायरल व्हिडीओ पुण्यातील लक्ष्मी रोडचा आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला श्री गजलक्ष्मी ढोल ताशा पथक ढोल ताशा वाजवताना दिसेल. त्यांचा ढोल ताशा पाहण्यासाठी लोकांची एकच गर्दी दिसत आहे त्यामुळे रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे पण तितक्यात अचानक एक रुग्णवाहिका येते तेव्हा ढोल ताशा पथकातील एक जण येतो आणि सर्वांना रस्ता मोकळा करण्यास सांगतो आणि पोलिसांच्या मदतीने रुग्णवाहिकेसाठी रस्ता मोकळा केला जातो. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. संस्कृती जपत माणुसकी दाखवणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
sanket_pardeshi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर लिहिलेय, “ढोल ताशाचा गजर सुरू असताना, आपत्तीची चाहूल लागताच क्षणात रुग्णवाहिकेसाठी रस्ता मोकळा! आपलं पुणे”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “शेवटी आपलं पुणे आहे माणुसकी असणारच ना” तर एका युजरने लिहिलेय, “पुणे आहे शेठ इथली लोक आहेच की ओ दिलदार जितकी वाकडी समजता तितकीच सरळ पण आहे ना भाऊ” आणखी एका युजरने लिहिलेय, “पथकात आम्हाला हेच ते शिकायला मिळत, शिस्त” एक युजर लिहितो, “अणि लोक म्हणतात पुण्यातील लोक कोणाला मदत करत नाही” तर एक युजर म्हणतो, “एकच ह्रदय आहे किती वेळा जिंकणार”