Pune Viral Video : पुणे हे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक शहर आहे. या शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी सुद्धा म्हणतात. या शहरातील ऐतिहासिक वास्तू, प्राचीन मंदिरे, गडकिल्ले इत्यादी गोष्टी या शहराचा इतिहास सांगतात. पुण्याला शिक्षणाचं माहेरघर सुद्धा म्हणतात. दरवर्षी हजारो विद्यार्थी पुण्यात शिक्षण घेण्यासाठी येतात. आता पुणे आयटी हब झाल्यामुळे नोकरीच्या शोधात दुरवरून लोक येतात आणि येथेच स्थायिक होतात. अनेक नॉन पुणेकर लोक कायमचे पुणेकर झाले आहे. सोशल मीडियावर पुण्यातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. पुणेरी पाटीपासून पुणे भाषेपर्यंत, लोकांना पुण्यातील अनेक गोष्टी पाहायला आवडतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पुण्यासारखं सुख कुठेच नाही, असे लिहिलेय.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तु्म्हाला पुणे शहरातील एक सुंदर रस्ता दिसेल. या रस्त्यावर वाहनांची ये जा सुरू आहे. सायंकाळची वेळ दिसत आहे. वातावरण अतिशय सुदंर दिसत आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “पुण्या सारखं सुख कुठेच नाही.” हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. पुणेकर लोकांना हा व्हिडीओ खूप आवडेल.
हेही वाचा : फक्त प्रेम! साडी, दागिने नाही तर दिवाळीनिमित्त बायकोला दिलं हटके गिफ्ट, VIRAL VIDEO पाहून म्हणाल, ‘हेच तर…’
“पुण्यासारखं सुख कुठेच नाही”
खरंच पुण्यासारखं सुख कुठेच नाही का? खरं तर पुणे हे अतिशय सुंदर शहर आहे. पुणे इतर शहराच्या तुलनेत शांत आणि सुरक्षित आहे. जो कोणी एकदा पुण्यात येतो, त्यांना पुणे हे आवडल्याशिवाय राहत नाही. अनेक लोक याच कारणामुळे पुण्यासाठी स्थायिक झालेले आहेत.
पाहा व्हायरल व्हिडीओ
rutika_waikar_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुणे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खरंय” तर एका युजरने लिहिलेय, “आम्ही पुणेकर आहेतच भारी…. पुणे तिथे काय उणे” आणखी एका युजरने लिहिलेय, “खरं आहे, आय लव्ह पुणे” एक युजर लिहितो, “एकदम बरोबर पुणे सोडून ३-४ दिवस कुठे गेलो ना बाहेर की कधी घरी येतोय असे होतो माझे पुणे” तर एक युजर लिहितो, “दिवाळीमध्ये दोन दिवस खरे पुणेकर पुण्यात असतात तेव्हा बघा आपल्या पुण्याचा निवांतपणा”
अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. काही युजर्सनी पुण्याचे कौतुक केले आहेत तर काही युजर्सनी त्यांच्या त्यांच्या शहराचे कौतुक केले आहेत. पुण्यातील यापूर्वीही असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.