Pune VIDEO : पुणेरी पाट्या हा शब्द जरी कानावर पडला तरी पुणे शहर आणि पुणेरी लोकं डोळ्यांसमोर येतात. देशातच नाही तर जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या पुणेरी पाट्या तुम्ही अनेकदा पाहिले असेल. कमाल शब्दात किमान अपमान करणे ही पुणेरी पाट्यांचे वैशिष्ट्ये आहेत. कधी घराबाहेर तर कधी हॉटेलमध्ये, कधी ऑफिसमध्ये तर कधी मंदिरात आपल्याला अनेक पुणेरी पाट्या पाहायला मिळतात. यातली एक विशेष प्रसिद्ध असलेली पुणेरी पाटी म्हणजे त्यावर लिहिलेले असते की ‘गेटसमोर वाहने लावू नये अन्यथा हवा सोडण्यात येईल” पण तुम्ही कधी वाहनातील हवा सोडताना पाहिले आहे का? हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की गेट समोर गाडी पार्किंग केल्याने एका पुणेरी काकाने चक्क गाडीची हवा सोडली. व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
[quiziframe id=19 dheight=282px mheight=417px
या व्हायरल व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक काका चक्क गाडीच्या मागच्या चाकातील हवा सोडताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. वाहनचालकाने गाडी थेट गेटसमोर लावली होती. त्यामुळे काकाने रागाच्या भरात गाडीच्या चाकातील हवा सोडली. या व्हिडीओवर लिहिलेय, “हे फक्त पुण्यात घडू शकतं. गेटसमोर पार्किंग केल्याने काकांनी गाडीची हवा सोडली”
pune_is_loveee या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “गेटसमोर वाहने लावू नये अन्यथा हवा सोडण्यात येईल अशा कितीतरी पाट्या तुम्ही पुण्यात पाहिल्या असतील, पुणेरी पाट्या म्हणून या पाट्यांचा विशेष नावलौकिक आहे, या पाट्यांवर लिहिलेला मजकूर हा फक्त वाचण्यासाठी नाही तर त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी ही केली जाते, हे काकांनी सिद्ध केले आहे..”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “सदाशिव पेठ येथे कुठेही गाडी लावा, हेच गिफ्ट मिळणार” तर एका युजरने लिहिलेय, “वाह किती छान आणि सुंदर उदाहरण दिले आहे समाजाला” काही युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहे तर काहींनी व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला आहे.