Pune Viral Video : पुण्यात कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. पुणे हे महाराष्ट्रातील एक लोकप्रिय शहर आहे. या शहराचा इतिहास या शहराची ओळख सांगतो. येथील प्राचीन मंदिरे, गडकिल्ले, वास्तु, ठिकाणे, पेठ्या, पुणेरी पाट्या, खाद्यसंस्कृती अतिशय लोकप्रिय आहे. पुण्यात अनेक नवनवीन गोष्टी पाहायला मिळतात. सोशल मीडियावर पुण्याचे अनेक व्हिडीओ तुफान व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पुण्याच्या रस्त्यावर एक कार जाताना दिसत आहे पण ही कार इतर कारपेक्षा वेगळी आहे. सध्या या कारचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. (pune video three wheeler car moving on pune road for driving testing video goes viral on social media)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक कार दिसेल. ही कार टेस्ट ड्रायव्हिंग करण्यासाठी रस्त्यावर उतरवली आहे. विशेष म्हणजे कार इतर कार पेक्षा वेगळी आहे. इतर कार या चारचाकी असतात पण ही कार तीन चाकी आहे. हो, व्हिडीओत तुम्हाला दिसेल की ही कार समोरून इतर कारप्रमाणे दिसते पण मागून बघितल्यास ऑटोप्रमाणे दिसते. तीन चाकी कार पाहून कोणीही थक्क होईल. पुण्याच्या रस्त्यावर ड्रायव्हिंग टेस्ट करणारी ही कार खरंच येणाऱ्या दिवसात बाजारात येणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “कुठली कंपनी असेल पुण्याच्या रोडवर नवीन गाडी दिसली. पुणे येथे तीनचाकी गाडी चारचाकी गाडीच्या रुपात” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Sharad Pawar Saif Ali Khan
“सैफच्या मुलाचाच बळी जाणार होता, पण…”, शरद पवार गटातील आमदाराचा मोठा दावा; म्हणाले, “सत्य सांगायला…”
Narendra modi BHIM UPI Babasaheb Ambedkar
“BHIM UPI चं नाव बाबासाहेबांच्या नावावर”, मोदींचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेने खोडून काढला? पुरावा देत म्हणाले…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Rajasthan Woman Anita Chaudhary Murder
Rajasthan Woman Murder: दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या महिलेचा निर्घृण खून; मृतदेहाचे केले सहा तुकडे, आरोपी गुल मोहम्मदचा शोध सुरू
sujay vikhe patil controversial Statement
Sujay Vikhe Patil : “आजपासून आचारसंहिता मोडतोय, जर कोणी…”, भाजपाच्या माजी खासदाराचं भरसभेत वादग्रस्त वक्तव्य!

पाहा व्हायरल व्हिडीओ

nagesh_parekar02_official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुणे तेथे काय उणे…” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “तीन चाकच डम डम” तर एका युजरने लिहिलेय, “पण गाडी एक नंबर आवडली आपल्याला” आणखी एका युजरने लिहिलेय, “ऑटोरिक्षा आणि चारचाकी कारचे कॉकटेल व्हर्जन” काही युजर्सनी ही गाडी महिन्द्रा कंपनीची असल्याचे लिहिलेय तर काही युजर्सनी ही गाडी बजाज कंपनीची असल्याचे लिहिलेय.

Story img Loader