Viral Video : सध्या नवरात्री सुरू आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रुपांची आराधना व पुजा केली जाते.नवरात्रोत्सवादरम्यान ठिकठिकाणी देवीची घटस्थापना केली जाते व दांडिया -गरबासारख्या विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. हे नऊ दिवस अतिशय उत्साहाने साजरे केले जातात. अनेक लोक देवीच्या दर्शनासाठी घराबाहेर पडतात. तुम्ही जर पुण्यातील देवींचे दर्शन करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. (Pune Video : Visit These 5 Must-See Devi Temples in pune during Navratri| Viral Video)
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पुण्यातील पाच देवीच्या मंदिरांविषयी माहिती सांगितली आहे. नवरात्रोत्सवादरम्यान तुम्ही या पाच मंदिरांना भेट देऊ शकता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे मंदिरे कोणती? जाणून घेऊ या.
पुण्यातील ‘या’ पाच देवीच्या मंदिरांना नवरात्रीत द्या भेट (Visit These 5 Must-See Devi Temples In Pune)
या व्हायरल व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे –
१.श्री महालक्ष्मी, सारसबाग
२.चतु:श्रृंगी देवी, सेनापती बापट रोड
३.तळजाई माता, तळजाई
४.माता वैष्णवीदेवी, पिंपरी
५.अष्टभुजा देवी, नारायण पेठ
याशिवाय पुण्यात अनेक ठिकाणी देवीचे मंदिरे आहेत, तुम्ही त्या मंदिरांना भेट देऊ शकता. तसेच ठिकठिकाणी सार्वजानिक देवीच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे व घट बसवण्यात आला आहे. तुम्ही येथे सुद्धा दर्शन घेऊ शकता.
पाहा व्हायरल व्हिडीओ
pune_is_loveee या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुण्यातील या पाच देवीच्या मंदिरांना नवरात्रीत नक्की भेट द्याच..”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “काळी जोगेश्वरी, दगडूशेठ दत्त मंदिराजवळ” तर एका युजरने लिहिलेय, “तांबडी जोगेश्वरी देवी राहिली दादा ग्रामदैवत आहे ती ” आणखी एका युजरने लिहिलेय, “भवानी माता मंदिर राहिली दादा भवानी पेठ” अनेक युजर्सनी शुभ नवरात्री असे लिहिलेय.
याशिवाय महाराष्ट्रातही माहूरची रेणुकामाता, तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी व वणीची सप्तश्रृंगी देवी अशी देवीची साडेतीन शक्तिपीठे आहेत. नवरात्रोत्सवातील नऊ दिवस येथे मोठी यात्रा भरते. देशभरातून भक्त या देवींच्या दर्शनासाठी येथे येतात.