Pune Video : पुणे एक ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. दर दिवशी हजारो लोक पुणे शहराला भेट देतात. येथील ऐतिहासिक वास्तू, प्राचीन मंदिरे, संस्कृती विशेष लोकप्रिय आहे. पुण्यात असे अनेक ठिकाणे आहेत जे बघण्यासाठी दूरवरून लोक येतात. पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणतात पण त्याचबरोबर पुणे शिक्षणाचे माहेरघर म्हणून सुद्धा ओळखले जाते. हल्ली पुण्यामध्ये आयटी सेक्टर वाढल्याने नोकरीच्या शोधात सुद्धा अनेक तरुण मंडळी पुण्याकडे धाव घेतात. पुणे फक्त पुणेकरांचेच नाही तर समस्त महाराष्ट्राचे आपले झाले आहे.अनेक जण पुण्यात येतात आणि पुण्यातच स्थायिक होत आहे.

पुण्यावर प्रेम करणारी अनेक लोक तुम्हाला दिसतील. तुम्ही जर पुणेकर असाल किंवा पुण्यात राहायला आला असाल तर तुम्हाला कोणी असं विचारतं का की काय आहे असं तुमच्या पुण्यामध्ये? जर यानंतर कोणी असेल तुम्हाला विचारेल तर तुम्ही त्यांना हा व्हायरल व्हिडिओ नक्की दाखवू शकता.

हेही वाचा : “आई घरी वाट बघत असेल…” प्रसिद्धीसाठी तरुणांचा जीवघेणा स्टंट; VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका

या व्हायरल व्हिडिओमध्ये पुण्यामध्ये असं काय खास आहे, याविषयी सांगितले. व्हिडिओमध्ये तुम्हाला पुण्यातील अनेक लोकप्रिय आणि प्रसिद्ध ठिकाणे दाखवले आहेत. मेट्रो स्टेशन, दगडूशेठ गणपती, खडकवासला धरण, शनिवार वाडा, पीएमटी बस, फर्ग्युसन कॉलेज, एफसी रोड, कलाकार कट्टा, स्वामीनारायण मंदिर, लाल महाल, गुडलक कॅफे, सारसबाग, झेड ब्रिज, पुणे कॅम्प, इस्कॉन टेम्पल इत्यादी पुण्यातील लोकप्रिय ठिकाणे या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतील. हे ठिकाणे बघून तुम्हाला एकदा तरी पुण्याला भेट द्यावी असे वाटते.
पुणेकरांना हा व्हिडिओ बघताना पुण्याविषयी अभिमान वाटेल. व्हिडिओमध्ये लिहिलेले आहे, “पुणे म्हणजे प्रेम.”

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : ‘जेव्हा लावलेला अंदाज चुकतो…’, बाईकवरून स्टंट करताना अचानक चाक निसटलं अन् पुढे जे घडलं…; VIDEO पाहून नेटकरी संतप्त

Shiva explorer या इन्स्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुण्यातील तुमची आवडती ठिकाणे कोणती?” या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “जसे असते सोन्याचे नाणे.. तसे आहे आमचं पुणे.. जिथे राहतात सगळे शहाणे.. ते आहे आमचं पुणे.. जिथे येण्यासाठी लोक करतात बहाणे.. ते आहे आमचं पुणे.. जिथे पिकतात मोत्याचे दाणे.. ते आहे आमचं पुणे” तर एका युजरने लिहिलेय, “पुणे म्हणजे प्रेम, पुणे म्हणजे दुनिया, पुणे म्हणजे जग, पुणे म्हणजे सृष्टी” आणखी एका युजरने लिहिलेय, “आमचे पुणे जगात भारी”