Viral Video In Pune : हल्ली तरुण मुले नाश्ता करण्यासाठी गाड्यावर जातात आणि गरमागरम नाश्ता करतात. तुम्हाला माहिती आहे का की गाड्याजवळ गेल्यानंतर ग्राहक विक्रेत्याला पहिला पहिला प्रश्न कोणता विचारतो? ग्राहक नाश्ता करण्यासाठी गाड्यावर गेला की पहिला प्रश्न विचारतो “गरम काय आहे?” त्यानंतर विक्रेता त्याला गरम कोणता पदार्थ आहे, हे सांगतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तरुण जेव्हा विक्रेत्याला गरम काय आहे? असे विचारतो, तेव्हा विक्रेत्याचे उत्तर ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. (pune video when customer ask what is hot in food Punekar food seller funny answered to him video goes viral)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाला विक्रेता?

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक गाडा दिसेल. या गाड्यावर तुम्हाला दोन तीन डझनभर पाव दिसतील आणि वडापावच्या प्लेट दिसतील. एक तरुण येतो आणि विक्रेत्याला विचारतो, “भाऊ गरम काय आहे?” तर यावर विक्रेता जे उत्तर देतो, ते पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. विक्रेता एकच शब्द बोलतो, “तवा” विक्रेत्याचे उत्तर ऐकून तुम्हीही पोट धरून हसाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पुण्यातील आहे. पुण्याच्या गोखलेनगर परिसरातील हा व्हिडीओ आहे. असं म्हणतात, “पुणेकरांच नाद करायचा नाही.” हे अगदी खरंय. हा व्हिडीो पाहून कोणीहीह थक्क होईल.

हेही वाचा : आनंद महिंद्रांनी केलं मुंबई महापालिकेचं तोंडभरून कौतूक! विजयोत्सवानंतर अशी झाली होती मरिन ड्राईव्हची अवस्था, पाहा Video Viral

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : फाटलेली किंवा खराब झालेली नोट तुम्ही कधी जोडली आहे? २० रुपयांची खरी किंमत समजून घेणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल

sanskars_rizz या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय,” स्वत:वरच भारी पडले” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी लिहिलेय, “पुणेकर असेच उत्तर देतात” तर एका युजरने तर हा गाडा कुठे असतो, त्याचा पत्ता लिहिलाय, “साठे वडेवाले दीप बंगला चौक सुखस्वाद हॉटेल शेजारी गोखलेनगर पुणे” आणि एका युजरने लिहिलेय, “पुणेकरांचा नाद करायचा नाही” आणखी एका युजरने लिहिलेय, “पुणे तिथे काय उणे” एक युजर लिहितो, “पुणेकरांबरोबर कधीही पंगा घ्यायचा नाही.” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune video when customer ask what is hot in food punekar food seller funny answered to him video goes viral ndj
Show comments