Viral Video : सध्या सगळीकडे पावसाचा जोर वाढला आहे. सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. पुण्यात पावसाचा जोर वाढल्याने पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण भरले आहे त्यामुळे खडकवासला धरणारे दरवाजे उघडले आहे. सध्या खडकवासला धरणावरील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये खडकवासला धरणाचे दरवाजे उघडल्यानंतरचे दृश्य दाखवले आहे. हे दृश्य पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
खडकवासला धरणाचे दरवाजे उघडल्यानंतरचे दृश्य
जोरदार पावसामुळे खडकवासला धरण पाण्याने चांगलेच भरले आहे. पाण्याची पातळी वाढल्याने या धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आणि त्यानंतर या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तु्म्हाला या धरणाच्या पाण्याचे दृश्य नयनरम्य वाटेल. व्हिडीओ पाहून काही लोकांना या धरणाला भेट द्यावीशी वाटेल पण असे करू नका. नागरिकांना सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या आहेत.
या दरम्यान नदीकाठच्या किंवा धरणा शेजारच्या गावातील लोकांनी विशेष काळजी घेणे आणि सतर्क राहणे अपेक्षित असते. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
खडकवासला धरण हे पुणे शहराला पाणीपुरवठा करणारे प्रमुख धरण म्हणून ओळखले जाते. पुण्यापासून फक्त २० किमी अंतरावर असलेले हे मुठा नदीवरीव धरण आहे. अनेक पर्यटक दरदिवशी या खडकवासला धरण पाहायला गर्दी करतात पण सध्या पावसाचा जोर वाढल्याने या धरणाजवळ कोणीही गर्दी करू नये.
हेही वाचा : Jobs for Newcomers: “वेळ, काळ, पैसा पाहू नका, फुकट कामाची तयारी ठेवा”, भारतीय वंशाच्या उद्योजिकेचं विधान चर्चेत; नेटिझन्सची टीका!
पाहा व्हायरल व्हिडीओ
just_pune_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “खडकवासला धरणाचे दरवाजे उघडल्या नंतर दृश्य” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आमचा खडकवासला” तर एका युजरने लिहिलेय, “माझं घर खडकवासला धरणाजवळ आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “दृश्य छान आहे पण पावसात कोणी घराबाहेर पडू नये.” अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि आजुबाजूच्या परिसरात पावसाचा जोर वाढल आहे. नदी, नाले भरताना दिसत आहे. अशावेळी नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी.