Viral Video : सोशल मीडियावर अनेक फॉरेनर भारतातील व्हिडीओ शेअर करतात. काही फॉरेनर भारत भेटीसाठी येतात तेव्हा भारतातील लहान लहान गोष्टींचे निरीक्षण करून त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर टाकतात तर काही फॉरेनर हे भारतात स्थायिक झालेले दिसतात. येथील संस्कृती व भाषा शिकतात व त्यांचे नवनवीन अनुभव सोशल मीडियावर सांगतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या असाच एका फॉरेनरचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ही फॉरेनर भाजीपाला खरेदी करताना दिसत आहे. विशेष म्हणजे ही फॉरेनर भाजीपाला विक्रेता महिलेबरोबर मराठी भाषेत संवाद साधताना दिसते. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओत तुम्हाला एक फॉरेनर भाजीपाला खरेदी करताना दिसते.

हेही वाचा : Swiggy : भारीच! कॅटरर्स, हलवाई नव्हे, जोडप्यानं ऑनलाइन केलं जेवण ऑर्डर; साखरपुड्यात पाहुण्यांसाठी खास सोय; पाहा मजेशीर पोस्ट

फॉरेनर – नमस्ते, आंबे कितीला आहे?
भाजीपाला विक्रेता – साठ रुपये किलो
फॉरेनर – बरं दोन किलो द्या.
(फॉरेनर एक आंबा उचलून बघते)
फॉरेनर – चांगले आहेत का?
भाजीपाला विक्रेता – चांगले आहे.
फॉरेनर – गोड आहेत?
भाजीपाला विक्रेता – गोड आहेत.
फॉरेनर – बरं दोन किलो द्या
भाजीपाला विक्रेता – दोन किलो नाही पाच किलो ने ना बेटा
(फॉरेनर हसते )
फॉरेनर – चांगले नाही निघाले तर बघा
भाजीपाला विक्रेता – चांगले निघाले तर मी तम्हाला बघेल (हसते
फॉरेनर – धन्यवाद
भाजीपाला विक्रेता – जेवण केले का?
फॉरेनर – आताच नाही. नंतर मी घरी जाऊन बनवते.
भाजीपाला विक्रेता – thankyou. आता मराठी शिकली माझी लेक.

पाहा व्हायरल व्हिडीओ

indian_persian_couple या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “फॉरेनर भाजीपाला खरेदी करताना..”

हेही वाचा : ‘मृत्यूचे सावट कधीही…’ सांस्कृतिक कार्यक्रमात ट्रान्सजेंडरसह डान्स करताना शिक्षकाबरोबर झालं असं काही… VIDEO पाहून उडेल थरकाप

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मुलगी शिकली प्रगती झाली, वाहिणी शिकली आणि महाराष्ट्राची लाडकी वहिनी झाली. ही बहिण
फक्त मराठी शिकत नाही तर मराठी बोलताना समोरच्या आदर देते. माझ्या बहिणीला कोणाची नजर लागू नये.” तर एका युजरने लिहिलेय, “येईल तुम्हाला हळू हळू मराठी भाषा… एकदम छान” आणखी एका युजरने लिहिलेय, “हे तर अनपेक्षित होतं! पण खूप भारी”
हा व्हिडीओ पाहून अनेक युजर्सनी या फॉरेनरवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. काही युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune video when foreigner buying vegetables by communicating with vegetable vendor in marathi language video viral on social media ndj