Viral Video : पुणे हे देशातील एक ऐतिहासिक शहर आहे. शिक्षणाचे माहेरघर, सांस्कृतिक शहर अशा अनेक नावाने पुणे शहर ओळखले जाते. मराठी भाषेवरील प्रेम, पुणेरी पाट्या, येथील ऐतिहासिक वास्तू, खाद्य संस्कृती इत्यादी गोष्टींमुळे पुणे खूप जास्त लोकप्रिय आहे. दरवर्षी हजारो लोकं शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी पुण्यात येतात. येथे येणारा प्रत्येक व्यक्ती पुण्याच्या प्रेमात पडतो. सोशल मीडियावरही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे हे शहर नेहमी चर्चेत असतं. तुम्हाला पुण्याविषयी काय माहिती आहे का? तुम्हाला माहितीये का पुण्यात सर्वात श्रीमंत कोण आहे? तुम्हाला वाटेल, पुण्यात सर्वात श्रीमंत कोण आहे, हे सहज कोण सांगू शकते? पण काही लोकांनी याचे खरे उत्तर दिले आहे ज्या उत्तराला तुम्हीही नाही म्हणणार नाही. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.

व्हायरल होतोय व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की पुणे शहर दिसेल. व्हिडीओवर लिहिलेय, “पुण्यात सर्वात श्रीमंत कोण आहे? त्यानंतर पुढे व्हिडीओत दगडूशेठ गणपतीचा फोटो दाखवतात आणि त्यावर कॅप्शन दिसून येते की पुण्यात श्रीमंत एकच. या व्हिडीओवर सुंदर श्रीमंत दगडूशेठ गणपती की जय हे सुंदर गाणे लावले आहे.

Santosh Juvekar
काही चित्रपट पैशांसाठी करावे लागतात; प्रसिद्ध अभिनेता म्हणाला, “मी कलाकार असलो तरी….”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
pimpri chinchwad latest news
पिंपरी-चिंचवड: चांगलं काम करणाऱ्यांना चांगलं म्हणा; अजित पवारांचे महेश लांडगेंना शाब्दिक टोले
amruta Khanvilkar
‘३ इडियट्स’मध्ये करीना कपूर ऐवजी ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीची झाली होती निवड; रोहन मापुस्कर म्हणाले, “मोठे स्टार…”
pranit more assaulted for joke on veer pahariya
माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवावर केला विनोद, प्रसिद्ध मराठी कॉमेडियनला बेदम मारहाण; प्रणित मोरे म्हणाला, “१० ते १२ लोकांचा गट…”
Sanjay Raut Ajit Pawar (1)
“अजित पवारांना आता मुख्यमंत्री व्हायचं नाही, कारण…”, संजय राऊतांची स्तुतीसुमने; नेमकं काय म्हणाले?
Ramesh Deo
मुंबईतील ‘या’ रस्त्याला दिले दिवंगत अभिनेते रमेश देव यांचे नाव; अजिंक्य देव भावना व्यक्त करत म्हणाले, “त्यांनाही निश्चितच आनंद…”
Amitabh Bachchan
“अमिताभ बच्चन यांना ‘दीवार’ साठी निवडले, त्यावेळी….”, प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणाले, “राजेश खन्ना…”

हेही वाचा : लेकीचं प्रेम! चिमुकलीने वडिलांसाठी बनवली चक्क पिठलं भाकरी, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल भावूक

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर हे प्रसिद्ध मंदिर आहे. दरदिवशी हजारो लोकं दुरवरून दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला येतात. अनेक भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. दगडूशेठ गणपतीला श्रीमंत संबोधले जाते. याच अनुषंगाने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती पुण्यात सर्वात श्रीमंत आहे. त्यामुळे या पुढे जर कोणीही विचारले की पुण्यात सर्वात श्रीमंत कोण तर तुम्ही सुद्धा आनंदाने आणि श्रद्धेने श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे नाव घ्याल.

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सनी कमेंट्समध्ये श्रीमंत दगडूशेठ गणपती लिहिले आहे. एका युजरने लिहिलेय, “बाप्पा मोरया” तर एका युजरने लिहिलेय, “हे जगजाहीर आहे” काही युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

Story img Loader