Pune Video : पुणे हे महाराष्ट्रातील लोकप्रिय शहर आहे. पुण्याला अनेक नावाने संबोधले जाते. कधी ‘ऐतिहासिक शहर’ तर कधी ‘महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी’, कधी ‘विद्येचे माहेर घर’ तर कधी ‘पुर्वेकडील ऑक्सफर्ड’ म्हणून ओळखले जाते.

खरं तर येथील ऐतिहासिक वास्तू, नाट्यगृहे, प्राचीन मंदिरे, पुणेरी पाट्या, शिक्षण, पुणेरी भाषा, खाद्यसंस्कृती नेहमी चर्चेत असतात. दरवर्षी हजारो तरुण तरुणी शिक्षणासाठी पुणे शहरात येतात. त्यातल्या काहींना पुणे एवढं आवडतं की येथेच स्थायिक होतात. पुण्यात असे कितीतरी लोक आहेत जे एकदा पुण्यात आले आणि कायमचे पुणेकर झाले.सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पुण्यातील काही खास ठिकाणांचे दृश्य दाखवले आहेत आणि जगात पुण्यासारखे शहर नाही, असे सांगितले आहे.

Pune shocking video A bike rider fell into a drainage in Pune's Narhe area
पुण्यात हे काय चाललंय? बाईकवरून जाताना तोल गेला; तरुण गाडीसह ड्रेनेजच्या खड्ड्यात पडला, पुण्याचा थरारक Video
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
youth assaults on duty traffic police at pune
Video: एवढा माज कुठून येतो? पुण्यात वाहतूक पोलिसाला भररस्त्यात मारहाण, व्हिडीओ व्हायरल
funny ukhana
“पुढच्या जन्मी मुकेश अंबानीच हवा”; काकूंचा उखाणा ऐकून काकांनी दोन्ही हात वर केले, पाहा मजेशीर Video
Horrible incident at the Kaziranga National Park in Assam shocking video
VIDEO: मृत्यू समोर दिसतो तेव्हा…समोर २ गेंडे अन् अचानक जिपमधून मायलेकी खाली पडल्या; जंगलातला थरारक शेवट आला समोर
pune fc road video : a puneri boy amazing suggestion to youngsters
Video : “मित्रा, यावर्षी तरी तिच्या इच्छा पूर्ण करण्याऐवजी …” पुणेकर तरुणाने दिला लाखमोलाचा संदेश, पुणेरी पाटी होतेय व्हायरल
Young Vidarbha boys Cooks Vangi Rassa Bhaji & Bittya on Chulha
विदर्भातील तरुणांनी चुलीवर बनवली झणझणीत वांग्याची रस्सा भाजी अन् खुसखुशीत बिट्ट्या; VIDEO पाहून तोंडाला सुटेल पाणी
Jitendra Awhad, Filming by police , Jitendra Awhad house, police at Jitendra Awhad house, Jitendra Awhad latest news,
VIDEO : जितेंद्र आव्हाडांच्या घरात पोलिसांकडून चित्रीकरण, आव्हाडांनी विचारला वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब

“जग फिरून या पण पुण्यासारखं शहर नाही…”

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला पुण्यातील रस्ते, पूल , काही फेमस ठिकाणे, हिरवा निसर्ग, पीएमटी बस असे अनेक ठिकाणे दाखवली आहेत. जर तुम्ही पुणेकर असाल किंवा पुणे शहरात राहत असाल तर तुम्हाला ही ठिकाणे ओळखता येईल. या व्हिडीओवर लिहिलेय, “जग फिरून आलो पण पुण्यासारखं शहर नाही” हा व्हिडीओ पाहून काही लोक भावूक होतील तर काही लोकांना जुने दिवस पुन्हा आठवतील.

हेही वाचा : Cab Driver : भारताबाबत अपशब्द वापरणाऱ्या पाकिस्तानी माणसाला टॅक्सी चालकाने उतरवून हाकललं, कुठे घडली घटना?

पाहा व्हायरल व्हिडीओ

iloovepune या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हो खरंय” तर एका युजरने लिहिलेय, “फक्त पुणेकरच समजू शकतो.” या व्हिडीओवर काही युजर्सनी टीका केली आहे. तो लिहितो, “हेच असं पण लिहू शकत होता की संपूर्ण जागा फिरून आलो पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांटा महाराष्ट्र सारखा दुसरा स्वराज्य नाही.”

सोशल मीडियावर पुण्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी पिएमटीच्या बसचा व्हिडीओ तर कधी येथील लोकप्रिय ठिकाणांचा व्हिडीओ नेहमी चर्चेत येतात. येथील लोकप्रिय खाद्य पदार्थांचे व्हिडीओ तर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. कोणी सोशल मीडियावर पुण्याच्या पाट्यांच्या गमती जमती सांगतात तर कोणी येथे पुणेरी लोकांचा स्वभावाचं वर्णन करतात. कधी पुण्याचे गणपती तर कधी पुण्याचा ढोलताशा चर्चेत येतो. पुणे हे नेहमीच चर्चेत असलेले शहर आहे.

Story img Loader