Pune Viral Video : पुणे हे महाराष्ट्रातील एक लोकप्रिय शहर आहे. या शहराचा इतिहास या शहराची ओळख सांगतो. या शहराला ऐतिहासिक शहर किंवा सांस्कृतिक शहर म्हणून सुद्धा ओळखले जाते. या शहरातील ऐतिहासिक वास्तू, प्राचीन मंदिरे, गडकिल्ले बघण्यासाठी लोक दुरवरून येतात. शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात शिक्षण घेण्साठी अनेक तरुण मंडळी देशाच्या कानाकोपऱ्यातून येतात. याशिवाय पुण्याजवळ हिंजेवाडी हे आयटी हब असल्यामुळे लोक नोकरीसाठी सुद्धा पुण्यात येतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पुण्यात कोणत्या जिल्ह्यातील सर्वात जास्त पोरं आहेत, हे विचारले आहे. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. (Pune Video young people of which district live most in pune netizens answered video goes viral)
पुण्यात कोणत्या जिल्ह्यातील सर्वात जास्त तरुणमंडळी आहेत?
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला पुण्याचा एक रस्ता दिसेल. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला पुणे शहराचा सुंदर परिसर दिसून येतोय. या व्हिडीओवर लिहिलेय, “पुण्यात कोणत्या जिल्ह्यातली जास्त पोरं आहे?” काही लोकांना वाटले असेल नागपूर – विदर्भ तर काही लोकांना नाशिक जळगाव, काही लोकांना वाटले असेल नगर सातारा, तर काहींना कोल्हापूर सोलापूर इत्यादी. तुम्हाला माहितीये का पुण्यात कोणत्या जिल्ह्यातली सर्वात जास्त पोरं आहे? या व्हिडीओवर नेटकऱ्यांनीच उत्तर दिले आहेत.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
pune_trending_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुणे म्हणजे आपुलकी आहे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “कोल्हापूरी आहे भावा” तर एका युजरने लिहिलेय, “सोलापूर लातूर जास्त आहेत” आणखी एका युजरने लिहिलेय, “जिल्हा सोडा युपी बिहार बंगाल ची जास्त दिसतील बेरोजगार” एक युजर लिहितो, “बीड लातूर” तर एक युजर लिहितो, “मला वाटते सातात कारण तिकडे विकास नाही आणि नोकऱ्या नाहीत” अनेक युजर्सनी वेगवेगळ्या जिल्ह्यांचे नावे घेतले आहे.