Pune Video : पुणे हे महाराष्ट्रातील ऐतिहासिक शहर आहे. पुणे शहराला महाराष्ट्राची ‘सांस्कृतिक राजधानी’ मानतात. पुणेरी पाट्या असो की येथील नियम नेहमी चर्चेचा विषय असतात. सध्या सोशल मीडियावर पुण्यातील एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पुण्यातील गाई ट्रॅफिक नियम पाळताना दिसत आहे.

पुणे हे मराठी संस्कृतीला जपणारे शहर आहे. पुण्यातील लोक हे अत्यंत शिस्तप्रिय असतात असं म्हणतात. येथील लोक नियम आणि वेळ काटेकोरपणे पाळतात. एवढंच काय तर पुणेकर स्वत:हून नियम बनवतात आणि पाळतात. याच नियमांना आपण ‘पुणेरी पाट्या’ म्हणून ओळखतो.
सध्या या व्हायरल व्हिडीओमध्ये पुण्यातील गाई ट्रॅफिक नियम पाळताना दिसत आहेत. सिग्नल सुटल्यानंतर वाहनांबरोबर या गाई पुढे रस्ता क्रॉस करताना दिसत आहेत. या शिस्तप्रिय गाईंची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

Pune shocking video A bike rider fell into a drainage in Pune's Narhe area
पुण्यात हे काय चाललंय? बाईकवरून जाताना तोल गेला; तरुण गाडीसह ड्रेनेजच्या खड्ड्यात पडला, पुण्याचा थरारक Video
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Shiva
Video : “तू दे होकार, मला तेच…”, आशूची नाराजी दूर करण्याची शिवाची हटके स्टाईल; मालिकेत पुढे काय होणार?
Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक
a jam-packed four-wheeler was spotted ferrying a crowd of people
VIDEO : चारचाकीला रेल्वेचा डब्बा समजलात का? प्रवासी मोजता मोजता थकाल, व्हिडीओ होतोय व्हायरल
SHIVA
Video : “तू कुठल्या अधिकाराने…”, शिवा-आशूमध्ये होणार पुन्हा भांडण; सिताई देणार नातं संपवण्याचा सल्ला, पाहा प्रोमो….
Jitendra Awhad, Filming by police , Jitendra Awhad house, police at Jitendra Awhad house, Jitendra Awhad latest news,
VIDEO : जितेंद्र आव्हाडांच्या घरात पोलिसांकडून चित्रीकरण, आव्हाडांनी विचारला वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “ही सीसीटीव्हीच…”, सूर्या निर्दोष असल्याचा पुरावा तुळजाला मिळणार का? ‘लाखात एक आमचा दादा’चा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला

हेही वाचा : Mumbai Police Video : मुंबई पोलिसांकडून बाप्पाला देण्यात आली अनोखी मानवंदना, सूरमयी सादरीकरणाचा व्हिडीओ एकदा पाहाच…

iloovepune या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “फक्त पुणेकरच नाही, तर पुण्यातील गाईपण ट्रॅफिक नियम पाळतात..”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “माणसांपेक्षा प्राण्यांना चांगली शिस्त समजते”, तर एका युजरने लिहिलेय, “पुण्यातील गाईंवर चांगले संस्कार आहेत” आणखी एका युजरने लिहिलेय, “गाई शिकल्या, पण लोक नियम पाळायला शिकले नाही…”

Story img Loader