Pune Viral Video: पुणे नेहमी कोणत्या कोणत्या कारणाने चर्चेत असते. पुण्यात कधी काय होईल याचा नेम नाही. कधी वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जाते तर कधी पुण्यातील रिक्षावाले प्रवासी आणि उबेर रिक्षाचालकावांर दादागिरी करताना दिसतात. कधी पीएमपीएल बसमध्ये प्रवासी आणि कंडक्टरचे सु्ट्यापैशांवरून भांडण होते. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील पीएमपीएमल बसमध्ये एक महिला पायत चप्पल घालून बोसच्या सीटवर पाय ठेवून बसली होती. कंडक्टरने वारंवार विनवणी करूनही ती ऐकत नव्हती. अशा घटनेचे व्हिडिओ सोशल मिडियावर रोज चर्चेत येतात. आता यात पीएमपीएमल
बसच्या नव्या व्हिडीओची भर पडली आहे ज्यात पुन्हा एकदा पीएमपीएमल बसच्या चालक आणि प्रवाशांमध्ये जोरदार भांडण झाले आहे.

बस चालक अन् प्रवाशामध्ये भांडण

मागचा दरवाजा वापरण्यापासून रोखल्याने प्रवाशाने पीएमपीएमएल बसच्या दारावर विट फेकली आणि चालकाला मारहाणी केली. लोणी स्टेशन चौकात बस चालक आणि प्रवासी यांच्यात झालेल्या फ्रीस्टाइल भांडणाचे दृश्य व्हायरल झाल्यानंतर दोन आठवड्यांनी पीएमपीएमएल चालक आणि प्रवाशांमध्ये आणखी एक भांडण व्हायरल झाले आहे.

बुधवारी सकाळी, पीएमपीएमएल बसमध्ये एका प्रवाशाला मागच्या दरवाजातून चढण्यापासून रोखण्यात आल्यानंतर हाणामारी झाली, जी बस सेवेच्या नियमांविरुद्ध आहे. ही घटना वाघोलीहून भेकराई नगरला जाणाऱ्या बस क्रमांक १६७ए वर सकाळी ९:१५ वाजता घडली. व्हिडओमध्ये एक माणूस बसच्या चालकाबरोबर मारमारी करताना दिसत आहे आणि कंडक्टर व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. एका प्रवाशाने हस्तक्षेप करून दोघांना थांबवले.

भेकराई नगरचे डेपो मॅनेजर सुरेंद्र दांगट यांनी फ्री प्रेस जर्नलशी बोलताना सांगितले की, “सकाळी ९ वाजताच्या सुमारास एका प्रवाशाने अमानोरा मॉलजवळ मागच्या दाराने उतरण्याचा प्रयत्न केला तेव्हा ही घटना घडली. बसमध्ये गर्दी होती आणि दुर्दैवाने तो आवश्यक असलेल्या थांब्यावर उतरू शकला नाही. ड्रायव्हरने त्याला पुढच्या थांब्यावर बसमधून उतरण्यास सांगितले, ज्यामुळे त्यांच्यात वाद झाला आणि नंतर वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या प्रकरणी विभागात तक्रार दाखल करण्यात आली आहे.”