Pune Viral Video : आजकाल इतके अपघात होत असतात रस्त्यावरून वाहन चालवणे सोडाच पण चालणे देखील अवघड झाले आहे. कधी कोणती गाडी कुठन येईल आणि रस्त्यावरील लोकांना उडवून जाईल याचा काही नेम नाही. अशा प्रकारणाचे कित्येक व्हिडिओ आतापर्यंत चर्चेत आले आहे. रस्त्यावरून चालताना लोकांना अक्षरश: जीव मुठीत घेऊन चालावे लागते. अशाच एका घटनेचा व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे.

गुरुवारी पुण्यातील उंड्री भागात एका ट्रॅक्टरने उभ्या असलेल्या कारला धडक दिली. दरम्यान या अपघातामध्ये दोन तरुणी थोडक्यात बचावल्या. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

पुण्यात ट्रॅक्टरची कारला जोरदार धडक (Tractor hits car in Pune)

व्हायरल व्हिडिओमध्ये, न्याती इस्टेट रस्त्यावर या मुली चालत जाताना दिसत आहेत, तेव्हा अचानक मागून एक ट्रॅक्टर येतो आणि पार्क केलेल्या कारला जाऊन धडकतो. ही धडक इतकी जोरदार होती की, धडकेमुळे कार मागे ढकलली जाते आणि त्यापैकी एक मुलगी कारबरोबर मागे ओढली जाते. मुलीची प्रकृती तपासण्यासाठी स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

व्हायरल व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी रोष व्यक्त केला.

पाहा Viral Video

एकाने म्हटले की,”पुण्यात रस्त्याच्याकडेला चालणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे कारण पुणे महापालिके(@PMCPune)द्वारे पादचाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या या इन्फ्रास्ट्रक्चरमुळे.

दुसरा म्हणाला की,”अशा घटना वांरवार होत असतात पण कोणीही त्यावर कारवाई करत नाही.”

तिसरा म्हणाला की, :उंड्रीमध्ये हे रोजचेच झाले आहे. पुणे वाहतूक पोलिस बांधकाम वाहनांचे काटेकोरपणे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. कालचा व्हिडिओ पहा जिथे उंड्री-हांडेवाडी रोडवर मयूर वजन काटा जवळ एक सिमेंट मिक्सर चुकीच्या दिशेने जात आहे.”

उंड्रीमध्ये अपघातामध्ये एकाच मृत्यू (One dead in accident in Undri)

मंगळवारी सकाळी फिरायला जाताना कारने धडक दिल्याने उंड्री येथील विद्या निकेतन सोसायटीत राहणारे ४९ वर्षीय सुजित कुमार सिंग यांचा मृत्यू झाला होता. ही घटना सकाळी ६:४० च्या सुमारास घडली. त्यात सिंग गंभीर जखमी झाले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना ससून जनरल हॉस्पिटल (एसजीएच) येथे नेण्यात आले परंतु तेथे पोहोचताच त्यांना मृत घोषित करण्यात आले.

ट्रॅक्टर अपघाताबात काय म्हणाले पोलिस (What did the police say about the tractor accident)

अपघातानंतर १० तासांच्या आत पुणे पोलिसांनी उंड्री येथील गंगोत्री कॉम्प्लेक्समधील रहिवासी असलेल्या हिट अँड रन आरोपी समीर गणेश कड (३२) याला अटक केली.

पोलिसांनी सांगितले की, “आम्हाला माहिती मिळताच, आम्ही जवळच्या सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने आरोपीचा तपास सुरू केला. आरोपी राखाडी रंगाचा टाटा नेक्सॉन चालवत असल्याचे समोर आले. आम्ही ताबडतोब आरटीओशी संपर्क साधला आणि गेल्या दोन महिन्यांत नोंदणीकृत राखाडी रंगाच्या टाटा नेक्सॉनची यादी मिळवली. यादीत अशा २,५०० वाहनांचा समावेश होता. नंतर, आम्ही उंड्री, मोहम्मदवाडी आणि हांडेवाडी भागातील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले आणि आरोपीच्या वाहनाचा नंबर मिळवला. आम्हाला आढळले की,”आरोपीने नंबर प्लेट काढून औताडवाडीतील एका निर्जन ठिकाणी त्याची गाडी लपवण्याचा प्रयत्न केला.”

पोलिसांनी कडला अटक केली आणि त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या कलम १०६ (निष्काळजीपणामुळे मृत्यू) आणि २८१ (अविचारीपणे गाडी चालवणे) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला. यासोबतच, पोलिसांनी कडविरुद्ध पुरावे गायब केल्याचा आरोप देखील लावला.