Pune Woman Viral Video: सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ, फोटो रोज व्हायरल होत असतात. त्यातील काही आपल्याला पोट धरून हसविणारे, तर काही थक्क करणारे असतात. कधी मजेशीर, विचित्र, धोकादायक, स्टंटचे असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियाच्या विश्वात कुठे काय घडेल आणि कधी व्हायरल होईल ते काही सांगता येत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पुण्यातील एका तरुणीचा आहे.

पुण्यात एका तरुणीने ऑफिसच्या बैठकीत चक्क डान्स करून उपस्थितांना थक्क केले. सोशल मीडियावरही या व्हिडीओने खळबळ उडवून दिली. ही महिला कर्मचारी तिच्या सहकाऱ्यांबरोबर कॉन्फरन्स रूममध्ये बसलेली दिसत आहे आणि ती अचानक उठते आणि ‘ओ रंगरेज’ गाण्यावर नाचू लागते, असे व्हिडीओतून समोर आले आहे.

Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Marathi actress Kishori Shahane Dance on varun Dhawan song video goes viral
Video: “लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक
Pune Railway Station in 1965
१९६५ मध्ये पुणे स्टेशन कसं होतं? VIDEO एकदा पाहाच
najma heptulla on indira gandhi emergency
Indira Gandhi: “इंदिरा गांधींना आणीबाणीचा पश्चात्ताप होत होता”, नजमा हेपतुल्ला यांचा आत्मचरित्रात दावा; विश्वासू व्यक्तींबाबतही होती तक्रार!
Lalu Prasad Yadav Controversial comment
Lalu Prasad Yadav Video : “नयन सेंकने….”; नितीश कुमार यांच्या महिला संवाद यात्रेबद्दल लालू प्रसाद यादव यांचं आक्षेपार्ह वक्तव्य
woman made saree from newspaper video viral
“अरे ही तर उर्फी जावेदपेक्षा खतरनाक”, तरुणीने चक्क न्यूज पेपरपासून बनवली साडी, Video पाहून लोक झाले शॉक
Deepika Padukone returns to mumbai with Baby Dua
Video: दीपिका पादुकोण तीन महिन्यांच्या लेकीला घेऊन परतली मुंबईत, दुआचा पहिला व्हिडीओ पाहिलात का?

वास्तविक, मासिक संघ बैठकीसाठी सर्व कर्मचारी पुण्यातील कार्यालयात जमले होते. झूमच्या माध्यमातूनही काही कर्मचारी बैठकीला उपस्थित होते. दरम्यान, ती तरुणी सर्वांसमोर आली आणि ‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटातील ‘ओ रंगरेज’ गाण्यावर नाचू लागली. तिची ही अनपेक्षितपणे समोर आलेली अनोखी अदा पाहून तिचे सहकारी आश्चर्यचकित झाले आणि नंतर तिचे नृत्य सादरीकरण पाहिल्यावर सर्व सहकाऱ्यांनी तिचे टाळ्या वाजवून कौतुक केले.

(हे ही वाचा : आयफोन नव्हे ही आहे लग्नाची पत्रिका! विश्वास बसत नसेल तर एकदा क्लिक करा अन् नीट बघा )

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, या तरुणीने ऑफिसच्या मीटिंगमध्ये डान्स करण्याचे धाडस कसे आणि का केले असेल? खरं तर नोकरी मिळविण्यासाठी प्रत्येकाला सीव्ही किंवा रेझ्युमे द्यावा लागतो आणि त्यामध्ये छंदाबाबतचा उल्लेख करावा लागतो. त्याचप्रमाणे पुण्यातील या तरुणीने आपल्या सीव्हीमध्ये डान्स आवडतो, असे लिहिले होते. मग काय, जेव्हा ऑफिसमध्ये टीम मीटिंग सुरू होते. त्यानंतर तिच्या वरिष्ठांना आठवते की, या व्हिडीओमधील तरुणीनं तिच्या रेझ्युमेमध्ये डान्सची आवड असल्याचे लिहिले होते. त्यामुळे ऑफिस जॉईन केल्यावर पहिल्याच टीम मीटिंगमध्ये त्या तरुणीला डान्स करायला सांगितला जातो. विशेष बाब म्हणजे या तरुणीनेसुद्धा न लाजता आणि आत्मविश्वासाने मीटिंगमध्ये सर्वांसमोर डान्स करून दाखवला.

येथे पाहा व्हिडीओ

या व्हायरल झालेल्या व्हिडीओतील तरुणीचे नाव अंजली असून, तिच्या या व्हिडीओला आठ दशलक्षांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. त्यावर विविध प्रकारच्या कमेंट्सही येत आहेत. काही लोक अंजलीच्या सपोर्ट स्टाफचे कौतुक करताना दिसले. तिच्या डान्स आणि आत्मविश्वासाचे नेटिझन्सही कौतुक करत आहेत. एका युजरने लिहिले, “मला हे ऑफिस खूप आवडले. किती छान वातावरण आहे! प्रत्येक जण खूप सपोर्टिव्ह आहे.” आणखी एकाने लिहिलेय की, “मलाही अशीच कामाची जागा हवी आहे, जिथे मी प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ शकेन.” इन्स्टाग्रामवर अंजलीचे २०,००० पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत आणि ती अनेकदा नृत्य आणि फॅशनशी संबंधित व्हिडीओ पोस्ट करीत असते.

Story img Loader