पुणे आणि पुणेकरांचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. पुणेकरांच्या नादाला सहसा कोणी जात नाही अन्यथा मोजक्या शब्दात अपमान सहन करावा लागतो. आपल्या स्पष्टवक्तेपणा आणि उपाहास्त्मक टीकेसाठी ओळखले जाणाऱ्या पुणेकरांसह वाद घालण्याआधी लोक शंभर वेळा विचार करतात. सोशल मीडियावर पुणेकरांचे अनेक व्हिडीओ आजकाल समोर येतात . अशाच एका व्हिडीओची सध्या चर्चा होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुणी रहदारीच्या रस्त्यावर एका रिक्षाचा रस्ता अडवून उभी आहे. रिक्षाचालकाला धडा शिकवण्यासाठी तरुणीने पुणेरी शैलीत उत्तर दिले आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते आहे की, एक तरुणी एका रिक्षाचालकाचा रस्ता अडवून उभी आहे. बाजून एक बस, कार जात आहे. वाहनांची ये-जा सुरू आहे. तरुणीने रिक्षाची वाट अडवल्याने रिक्षाचालकाना पुढे जाता येत नाहीये. पण तरुणीने रिक्षाचालकाची वाट का अडवलीये असा प्रश्न पडाला असेल? त्याचे झाले असे की, हा रिक्षाचालक चुकीच्या दिशेने रिक्षा चालवत होता जे अत्यंत धोकादायक आणि वाहतूक नियमांच्या विरोधात आहे. रिक्षाचालकाला धडा शिकवण्यासाठी एक पुणेरी तरुणीने त्याच्या रिक्षासमोर गाडी थांबवली आहे. भररस्त्यात तरुणीने रिक्षाचालकाची वाट अडवून ठेवली आहे. चुकीच्या दिशेने रिक्षा चालवण्याची संधी देत नाही. रिक्षाचालकाने रिक्षा मागे घेऊन वाहतूक नियमांचे पालक करून रस्ता ओलांडावे यासाठी ही तरुणी प्रयत्न करत आहे. हा व्हिडीओ लोकांना प्रचंड आवडला असून सर्वत्र व्हायरल झाला आहे. तरुणीच्या हिंमत्तीचे आणि प्रयत्नाचे लोक कौतूक करत आहे.
हेही वाचा – गोव्यात कोबी मंच्युरियनवर बंदी! कसा तयार झाला हा भारतीय-चायनीज खाद्यपदार्थ?
व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट केल्या आहे. एकाने लिहिले की, “स्कुटी वाली बाई शंभर टक्के डाहुणकर कॉलनी कोथरूडची रहिवासी असणार आणि रिक्षावाला पिंपरी चिंचवड चा रहिवासी असणार” दुसरा म्हणाला, ” (रिक्षाचालक) हे पुणेकर नाहीत. नाव खराब करुण ठेवलं आहे आमच्या पुण्याचं. सलग ४/५ दिवस सुट्टया आल्या की, आमचं पुणे मोकळा श्वास घेत. “तिसरा म्हणाला, “रिक्षावाले पुण्याचे जावई आहेत रे बाबा, त्यांना काही बोलता येत नाही ” चौथ्या व्यक्तीने लिहिले,”रिक्षावाल्यांना कुठलाही नियम, कायदा लागू होतं नाही, खुद्द पोलीस पण त्यांच्या नादी लागतं नाहीत.” पाचव्याने लिहिले,”मी पण नाही जाणार अन तुला पण जाऊ देणार नाही.”आणखी एकजण म्हणाला,”हे व्हायलाच पाहिजे. १००% चुकीच्या बाजूने ड्रायव्हिंग करणाऱ्यांचा बिमोड असाच चोख केला पाहिजे.”