Punit superstar video: आजकाल सोशल मीडियावर लोकप्रिय व्हावं असं प्रत्येकाला वाटतं. लोकांना आकर्षित करण्यासाठी युजर्स विचित्र कृत्य करायला देखील मागे-पुढे पाहात नाहीत. अशा कृत्यांचे व्हिडिओ तुफान व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर कदाचित तुम्हाला किळसवाणं वाटू शकतं. पुनीत सुपरस्टार आपल्या चित्रविचित्र स्टंटबाजीसाठी प्रसिद्ध आहे. कधी तो भररस्त्यात कपडे काढून फिरतो तर कधी कोल्डड्रींक्सनं अंघोळ करतो. कधी गटारामध्ये लोळतो तर कधी विचित्र असे डान्स करून दाखवतो. लक्षवेधी बाब म्हणजे या सगळ्या गोष्टी विचित्र वाटत असल्या तरी देखील त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात आणि तो लाखो रुपयांची कमाई करतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याच प्रसिद्धीच्या जोरावर त्याला बिग बॉस OTT मध्ये भाग घेण्याची देखील संधी मिळाली होती. असो, पण या सुपरस्टारचा आता एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तो चक्क ब्रेड चिखलात बुडवून खात आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पुनीत रस्त्याच्या कडे जिथे खूप चिखल आहे तिथे झोपलेला दिसत आहे. यावेळी त्याच्या हातात ब्रेडचं एक पॅकेटही आहे. पुढे तो याच पॅकेटमधून एक ब्रेडचं स्लाईस काढतो आणि त्यामध्ये चिखल टाकून अक्षरश: खावून टाकतो. एवढंच नाही तर पुढे तो चिखलात असलेलं पाणीही झोपून पिऊ लागतो. हे सगळं वाचून तुमचाही जर विश्वास बसत नसेल तर एकदा हा किळसवाणा व्हिडीओ पाहाच. बरं हे असं काहीतरी विचित्र करण्याची त्याची काही पहिली वेळ नाही याआधाही त्यानं गटारातलं पाणी प्यायला आहे तर कधी गोठ्यातलं शेण खाल्लं आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचीही झोप उडेल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> एक लाट अन् माय-लेकींचा थेट मृत्यूशी सामना; नेमकं काय घडलं? Shocking Video पाहून अंगाचा थरकाप उडेल

हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. तर अनेकांनी त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी म्हणतेय पुनीतला वेड लागलेय, तर कोणाच्या मते हा कॉन्टेंट कधीच कोणी कॉपी करू शकणार नाही. तर आणखी एकाने लिहिलं की, “काय काय बघावं लागत आहे. कसे कसे लोक आहेत पृथ्वीवर”. असो, तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला? यावर तुमची काय प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Puneet superstar eating bread with mud shocking video goes viral on social media srk