Pune Viral Video : नुकताच गणेशोत्सव सगळीकडे उत्साहात साजरा करण्यात आला. दहा दिवसांच्या बाप्पानी ढोल ताशाच्या गजरात सर्वांचा निरोप घेतला. बाप्पाचा आगमन सोहळा जितक्या उत्साहात साजरा केला जातो तितक्याच उत्साहाने बाप्पाचा विसर्जन सोहळाही साजरा केला जातो.
महाराष्ट्रात सर्वात मोठा विसर्जन सोहळा पाहायला मिळतो. जिकडे तिकडे ढोल ताशांचा गजर व त्यावर थिरकणारे लोक दिसून येतात. सध्या असाच एक पुण्यातील व्हिडीओ व्हायरल होत आहे. मिरवणुकीत सुरू असलेले गाणे ऐकून आजीला डान्सचा मोह आवरत नाही आणि घराच्या छतावर डान्स करताना दिसते. (Punekar aaji danced on the terrace of the house watch viral video by seeing Pune Ganpati Visarjan Miravnuk)
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला रस्त्यावर गणपती विसर्जनाची मिरवणूक दिसेल. या गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत अनेक लोक डान्स करताना दिसत आहे. पण पुढे व्हिडीओत तुम्हाला दिसेल की घराच्या छतावर एक पुणेकर आजी डान्स करत आहे. मिरवणुकीत सुरू असलेले गाणे ऐकून आजीला डान्स करण्याचा मोह आवरत नाही आणि आजी बिनधास्त डान्सचा आनंद लुटताना दिसते. पुणेकर आजींचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “आजी ऑन फायर पुणेकर बोलते”
पाहा व्हायरल व्हिडीओ
scenic_route____ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुणेकर” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हे फक्त पुण्यात पहायला मिळतं..” तर एका युजरने लिहिलेय, “नाद पाहिजे फक्त..” आणखी एका युजरने लिहिलेय,”आज्जी लय भारी” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी आजीचे कौतुक केले आहे तर काही युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.
सध्या गणपती विसर्जनाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सध्या असाच एका कोकणकर काकांचा व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये हे काका डोक्यावर गणपती घेऊन डान्स करताना दिसत आहे. काकांचा डान्स पाहून नेटकऱ्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.