Viral Video : सोशल मीडियावर दीपावलीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. दीपावलीनिमित्त सगळीकडे गर्दी दिसून येत आहे. अशातच रस्त्यावरील बाइकवरुन ट्रिपल सीट जाणाऱ्या कुटूंबाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तरुणीने चक्क डोक्यावर आकाश कंदील घातला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा व्हायरल व्हिडीओ पुण्याचा आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की दिवाळीची खरेदी करुन बाईकवरुन एक कुटूंब घरी परत जात आहे. बाइकवरुन ट्रिपल सीट जाणाऱ्या या कुटूंबाचा व्हिडीओ सध्या चर्चेत आलाय कारण बाइकवर मध्ये बसलेल्या तरुणीने चक्क डोक्यावर आकाश कंदील घातला आहे.

तुम्हाला वाटेल या तरुणीने असं का केलं असावं? खरं तर गाडीवर थोडी जागा कमी पडल्यामुळे या तरुणीने आकाश कंदील डोक्यावर घातला आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही म्हणेल की पुणेकरांचा नाद करायचा नाही!

हेही वाचा : VIDEO : अस्सल मराठी सौंदर्य! तरुणीने सादर केली लावणी, नाशिकचा व्हिडीओ होतोय व्हायरल

punekar2.0_og या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “गाडीवर थोडी जागा कमी पडली” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “डोक्याला आणि आकाश कंदीलला सुरक्षा” तर एका युजरने लिहिलेय, “दिवाळी स्पेशल हेल्मेट”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Punekar girl bring akash kandil on head due to lack of space on bike pune video goes viral during diwali ndj