Puneri pati behind car: पुणेकर त्यांच्या वैशिष्टपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमी चर्चेच्या विषय ठरतात. पुणेरी किस्से आणि पुणेरी पाट्या जगजाहीर आहेत. पूर्वी ट्रक किंवा मालवाहू जड वाहनांच्या मागे लिहिलेला संदेश अनेकांचे लक्ष खेचून घेत असे. अनेकदा सुविचारांसह सामाजिक जागृती करण्याचे काम या संदेशातून केले जात असे. हा ट्रेंड हळूहळू चारचाकी वाहनांपर्यंत आला. अशाच एका पुण्यातील कारच्या मागे लिहलेला संदेश सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. . मात्र यावेळी पुणेकरांनी या पाटीवर कुणाचा अपमान नाही केला तर स्वत:चीच बाजू मांडली आहे.

विशेष म्हणजे ही गाडी मुंबईची आहे मात्र तरीही एरवी मुंबईकरांना नावं ठेवणारे पुणेकर या गाडीला पुण्यात सामावून घेत आहेत. याच कारण तुम्हाला गाडीच्या मागे लिहलेल्या पाटीवरुनच कळेल. तुम्हीच पाहा आता ही पाटी आणि पोट धरुन हसा.

नेमकं काय लिहलंय गाडीच्या मागे?

बरेच जण नवीन गाडी खरेदी करताना पुणे-मुंबईसारख्या शहरांना प्राधान्य देतात. अशावेळी पुणे किंवा मुंबईमधून गाडी घेतली जाते. किंवा कधी कधी आपण सेकंड हँड गाडी घेतो तेव्हा गाडीच्या मागची नंबर प्लेट ही पहिल्या ओनरने घेतलेल्या ठिकाणच्या पासींगची असते. अशाच एका पुणेकरानं मुंबई पासिंग कार घेतल्यामुळे गाडीच्या मागच्या नंबरमुळे ही गाडी मुंबईची असल्याचा अंदाज बरेच जण लावत होते. मात्र पुणेकर तरुणानं आपला पुणेरी बाणा जपण्यासाठी आणि आपण पुणेकर नाही हे सांगण्यासाठी भन्नाट आयडीया वापरली.

याला म्हणतात पुणेकरांचा धाक ?

या तरुणानं आपल्या कारच्या मागे “नंबर मुंबईचा असला तरी गाडी पुण्याची आहे” असं लिहलं. त्यामुळे कारच्या नंबरवरुन कुणीही आता हे मुंबईची आहे असं म्हणणार नाही. मात्र याला पुणेकरांचा धाक म्हणावा की पुणेकर म्हणून ओळख जपण्याचा प्रयत्न केलाय म्हणावं? हे फोटा पाहून तुम्हीच सांगा.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> केरळमध्ये हाहाकार! वायनाडमध्ये लोकं झोपली होती तेवढ्यात निसर्गाचा प्रकोप झाला; VIDEO पाहून तुमचाही थरकाप उडेल

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

हा फोटो beingpunekarofficial नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अस्सल पुणेकर, पुणेकरांचा धाक, अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया यावर पुणेरी नेटकरी देत आहेत.