Viral video: भारतात गाड्यांच्य मागचे स्लोगन लय हिट हायत भाऊ. ‘मेरा भारत महान’ तर जवळजवळ प्रत्येक ट्रकच्या मागे लिहिलेलंच असतं. याशिवाय काही गाड्यांच्या मागे कुटुंबातील सदस्यांची नावे दिसून येते. किंवा बहुतेकवेळा गाडी ही बाबांनी आईनं गिफ्ट केलेली असते. त्यामुळे त्यावर डॅड्स गिफ्टेड वगैरे लिहलेलं पाहायला मिळतं. तसेच दुसऱ्यांवर आपल्या गाडीचा प्रभाव पाडण्यासाठी असो किंवा आवड म्हणून पण गाडयांच्या मागे अशी वाक्य लिहिणे हा एक कायमचा ट्रेंड झाला आहे. रस्त्यावरील प्रवासादरम्यान आपल्या बहुतेक वेळा गाड्यांच्या मागे वेगळ्या प्रकारची वाक्य लिहलेली दिसतात. दरम्यान अशीच एक पुण्यातली गाडी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये या गाडीच्या मागे लावलेल्या पुणेरी पाटीची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
खास बाहेरुन पुण्यात आलेल्या पुणेकरांसाठी ही पाटी लिहली आहे. पुणेकर त्यांच्या वैशिष्टपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमी चर्चेच्या विषय ठरतात. पुणेरी किस्से आणि पुणेरी पाट्या जगजाहीर आहेत. अशाच एका पुणेरी पाटीची चर्चा सध्या सगळीकडे जोरात सुरू आहे.एक पाटी सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. मात्र यावेळी पुणेकरांनी या पाटीवर कुणाचा अपमान नाही केला तर तरुणाईला खरंच एक संदेश देण्याचा प्रयत्न केलाय. एरवी पुण्याबाहेरची पुणेकरांना नाव ठेवणारी लोकंही या पाटीचं कौतुक करत आहेत. तुम्हीच पाहा आता ही पाटी..पाही पाटी पाहून म्हणाल आतापर्यंतची सगळ्यात भारी पुणेरी पाटी…
आता तुम्ही म्हणाल गाडीमागे असलेल्या या पाटीवर असं लिहिलंय तरी काय? तर या पाटीवर “घायल तो यहा हर परींदा है, लेकिन फिरसे जो उड सका वही जिंदा है! ” असा मेसेज लिहला आहे. म्हणजेच, टेन्शन, चिंता सगळ्यांनाच आहे मा्त्र त्यातूनही जो प्रयत्न करतो तोच जिंकतो असा सांगण्याचा प्रयत्न यावेळी केला आहे. जे लोक नोकरीसाठी आपल्या घरापासून लांब येतात आणि कष्ट करतात अशांसाठी ही पाटी लावली आहे.
पाहा व्हिडीओ
लोक वेगवेगळ्या कमेंट करत आहेत
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर लोक खूप कमेंट करत आहेत. विनोदी स्वरात कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, “शहरातलं आयुष्य सोपं नसतं मित्रा” तर आणखी एकानं, “‘”मी चांगल्या विचारांच्या भावाचा खूप आदर करतो” अशी प्रतिक्रिया दिली आहे.