Viral news: ‘पुणे तिथे काय उणे’ असं पुण्याबाबत नेहमी म्हटलं जातं, याचा प्रत्यय आज आला. पुणे हे जगात प्रसिद्ध शहर आहे. पुणेकर त्यांच्या वैशिष्टपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमी चर्चेच्या विषय ठरतात. पुणेरी किस्से आणि पुणेरी पाट्या जगजाहीर आहेत. पुणेकर, पुणेकारांच्या गोष्टी, त्यांनी केलेले अपमान, त्यांच्या भन्नाट करामती आणि त्यासोबतच त्यांनी केलेले कौतुकास्पद आणि धैर्यवान कार्य याचे किस्से आपण कायमच ऐकतो. पुणेकरांनाचं असल्या भन्नाट कल्पना सुचू शकतात, असंही अनेकजण म्हणतात. मात्र हे तितकंच खरं देखील आहे. पुणेकरांच्या अनेक करामतींची राज्यभर चर्चा होते. अशाच एका करामतीची चर्चा सध्या समोर आली आहे. पुण्यातल्या एका सेलॉनचं रेट कार्ड सध्या व्हायरल होत आहे.
सातत्याने वाढणाऱ्या महागाईच्या झळा आपल्या सर्वांनाच बसत आहेत. दिवसेंदिवस सामान्य माणसाला जगणे मुश्किल होते आहे. या सर्व गदारोळात सामान्य माणसाला महागाईची झळ सोसावी लागतेय. अन् याचिच प्रचिती देणारा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान पुण्याच्या या सेलॉनचं रेट कार्ड वाचून तुम्हीही डोक्याला हात लावाल. आता तुम्ही म्हणाल रेट कार्मडध्ये असं लिहलंय तरी काय?’ खरं तर हा फोटो एका सेलॉनमधला आहे. पण या सेलॉनमध्ये केस कापण्यासाठी इतके पैसे घेतात की पाहून तुम्ही देखील दंग व्हाल. लोक म्हणताहेत, इतक्या पैशात अख्खं गाव केस आणि दाढी करेल.
तुम्ही या फोटोमध्ये पाहू शकता एका सेलॉनचं रेट कार्ड आहे. तुम्ही जर या किंमतींवर नजर मारलीत तर तुम्ही थक्कच व्हाल. कारण या ठिकाणी पुरुषांचे केस कापण्यासाठी २१०० रुपये घेतात. तर दाढी करण्यासाठी ६०० रुपये घेतले जात आहेत.
महिला (हेयर स्टाइलिस्ट आणि किंमत )
रोहित- २१०० रुपये
अनुष्का- १५०० रुपये
मास्टर स्टाइलिस्ट- १३०० रुपये
जूनियर स्टाइलिस्ट- ७५० रुपये
पुरुष (हेयरस्टाइलिस्ट आणि किंमत):
रोहित – १४००,
अयाज/कपिल- १०५०,
सीनियर बारबर- ७००,
बारबर- ५००
दाढी –
रोहित- ६००
अयाज/कपिल- ५००
सीनियर बारबर- ३५०,
बारबर – २५०
पाहा सेलॉनचं रेट कार्ड
कमीत कमी शब्दांत समोरच्याचा जास्तीत जास्त अपमान करण्याची कला पुणेकरांनाच साधली आहे, असे म्हणतात. त्याचप्रमाणे कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त खवचट आशय व्यक्त करणारी पुणेरी पाटीही कोणी येरा गबाळा बनवू शकत नाही.पुणेरी पाटय़ा म्हणजे पुणेकरांसाठी अभिमानाचा वारसा. केवळ बुद्धिमत्ता नाही तर खास पुणेरी तैलबुद्धीतून पाटय़ांच्या माध्यमातून पुणेकरांचा स्पष्टवक्तेपणा आणि थेट भिडण्याची वृत्ती झळकते