पुणेकरांचं डोकं नेमकं कुठे आणि कधी चालेल याचा काहीच नेम नाही. आपल्या सरळ आणि थेट स्वभावामुळे पुणेकर हे नेहमी चर्चेत असतात. पुणेकरांच्या याच स्वभावामुळे पोलिसांना चांगलीच अद्दल घडली आहे. पुण्याच्या वाहतूक कोंडीमुळे वारंवार नागरीक तक्रारी करत असतात. बेशिस्तपणे वाहने चालवणे, सिग्नल तोडणे, कोणतेही वाहतुकीचे नियम न पाळणे अशा नागरिकांमुळे वाहतुकीच्या अनेक समस्या निर्माण होतात. दरम्यान जर पोलिसच नियम तोडत असतील तर शांत बसतील ते पुणेकर कसले.
एखाद्या वाहनचालकानं थोडाही नियम चुकवला, की वाहतूक पोलीस कायद्याचा बडगा उगारीत त्यावर दंडात्मक कारवाई करतात. वाहतुक पोलीस वारंवार नागरिकांना वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन करत असतात. शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करत वाहतुकीचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर पोलीस कारवाई करत असतात. दरम्यान दुचाकी चालवताना पोलिसांनी मागे बसणाऱ्या प्रवाशालाही हेल्मेट बंधनकारक केल्यानंतर अनेकांनी विरोध केला होता. मात्र नागरिकांकडून नियमांचं पालन करण्याची अपेक्षा असताना मात्र पोलीसच कायदा मोडत असतील, तर त्यांच्यावर कोण कारवाई करणार, हा खरा प्रश्न आहे.याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून पुणेकरांनी मात्र या दोन पोलिसांना चांगलीच अद्दल घडवली आहे.
वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या या पोलिसांचा फोटो @Benevolantly या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हे पोलीस हेल्मेट न घालता बाईकनं प्रवास करत होते. ही घटना कुंभारवाडा या परिसरात घडली आहे. आता पोलीसच जर नियम तोडत असतील तर सामान्य नागरिकांनी नियमांचं पालन करावं असा अट्टहास का केला जातो? अशा कॅप्शनसह हा फोटो पोस्ट करण्यात आला. यानंतर ही पोस्ट इतकी व्हायरल झाली की याची वाहतुक पोलिसांनी नोंद घेतली. पोलिसांनी देखील या पोस्टला गांभीर्यानं घेत लगेचच नियम तोडणाऱ्या त्या दोन पोलिसांना दंड ठोठावला. आणि या दंडाची ऑनलाईन पावती ट्विटरवर शेअर केली. पुणेकरांचा नाद नाही म्हणत आता सर्वत्र याचं कौतुक केलं जातंय.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> बैलाची धडक, ट्रकचा धक्का अन् बाईकस्वार थेट…अपघाताचा Video पाहून तुमच्याही काळजात होईल धस्स!
या पोस्टवरती लोक भरभरुन कमेंट्स करत आहेत. तर असे अनेक लोक आहेत, जे या पोस्टला शेअर आणि लाईक्स करत आहेत. ज्यामुळे ही पोस्ट सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागली आहे.