पुणेकर हे त्यांच्या बेधडक आणि बिनधास्त स्वभावासाठी ओळखले जातात. पुणेकर नेहमी स्पष्ट बोलतात. कोणालाही न घाबरता आपले मुद्दे स्पष्टपणे मांडतात. किमान शब्दात कमाल अपमान करण्याचे कौशल्य हे पुणेकरांकडे आहे त्यामुळे सहसा त्यांच्या कोणी लागत नाही. पुणेकर तसे कोणाला घाबरत नाही पण एक अशी गोष्ट आहे ज्याला सर्वच पुणेकर घाबरतात असा दावा एका व्हायरल व्हिडीओ होत आहे. तुम्ही योग्य तेच ऐकत आहात. तुम्हालाही प्रश्न पडला असेल की कोणती अशी गोष्टी आहे की ज्याला पुणेकर घाबरतात? सध्या व्हायरल व्हिडीओमध्ये या गोष्टीचा खुलासा केला आहे. व्हिडिओमध्ये पाहा कोणती आहे ती गोष्ट.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्यात वाहतूकीच्या अनेक समस्या आहेत त्यापैकीच एक म्हणजे पार्किंगची समस्या. पुण्यातील रस्ते, गल्ल्या छोट्या असल्यामुळे अनेक ठिकाणी पार्किंगसाठी जागा कमी पडते. महापालिकेने अनेक ठिकाणी पार्किंगची सुविधा केली आहे ती सम विषम तारखेनुसार पाळली जाते. पण पार्किंगच्या क्षमतेपेक्षा जास्त गाड्या पुण्यातील रस्त्यावरून धावतात त्यामुळे अर्थात पार्किंगसाठी जागा कमी पडते त्यामुळे अनेकदा जागा मिळेल तिथे गाडी पार्क करावी लागते पण हे काम वाटते तेवढे सोपे नाही. गाडी पार्क केल्यानंतर पुणेकरांच्या मनात एकच धाकधुक असते की प्रादेशिक परिवहन कार्यालयाची (RTO) गाडी येईल आणि आपली दुचाकी उचलून नेतील. त्यानंतर चलन फाडल्याशिवाय गाडी काही परत मिळत नाही. अनेकदा काही लोक आरटीओ कर्मचाऱ्यांची हुज्जत घालतात पण त्याचा काही फायदा होत नाही कारण नियमभंग झाल्यास दंड तर भरावाच लागतो. शहरात कुठेही गाडी दिसली की लोक झटपट आपली दुचाकी घेऊन पसार होतात. म्हणूनच असा समज आहे की,”पुणेकरांना जर कोणाची भिती असेल तर ती फक्त आरटीओच्या गाडीची असते.”

इंस्टाग्रामवर pune_tour_12 and 2 others हा व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “पुणेकर फक्त त्याच गाडीला घाबरतात, बाकी कोणलाचा घाबरत नाही. बरोबर ना पुणेकर?

व्हिडीओवर कमेंट करत अनेकांही या मतावर सहमती दर्शवली नाही. काहींनी कमेंट केली की आम्ही नाही घाबरत तर काही म्हणाले की “खरे पुणेकर नाही घाबरत.”

शेवटी मुद्दा इतकाच लक्षात घ्यावा की, जे वाहतूक नियमांचे पालन करतात त्यांना कोणालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. आरटीओच्या गाड्यांची भिती ही नियमभंग करणार्‍यांना असते.