पुणे आणि पुणेकर नेहमीच चर्चेचा विषय ठरता. पुणेकरांच्या व्यक्तीमत्त्व, स्वभावाची झलक दाखवणारे अनेक व्हिडिओ व्हायरल असतात. पुण्यातील असाच एका व्हिडिओची सध्या चर्चा होत आहे. व्हिडीओमध्ये पुण्यातील एका कारंज्याचा आहे जिथे एक व्यक्ती उभी असलेली दिसत आहे. व्हिडिओ पाहून अनेकांना प्रश्न पडला आहे की ही व्यक्ती तिथे काय करत आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून अनेकांनी उलटं सुलटं तर्क लावत आहे पण नक्की काय आहे प्रकरण, हे जाणून घेऊ या…
कारज्यांवर चढले पुणेरी काका?
व्हिडीओमध्ये पाहू शकता की, “पुण्यातील एफसी रोडवर गुडलक कॅफेच्या समोरील चौकात एक कारंज्यावर एक काका उभे असलेले दिसत आहे. कारंज्यांमधऊन पाणी येताना दिसत आहे आणि लाईटिंग देखील सुरु असल्याचे दिसत आहे. व्हिडिओ पाहून अनेकांना असे वाटते की, वाढत्या उन्हाच्या पाऱ्यामुळे हैराण झालेले काका थेट कारज्यांच्यावर चढले आहेत आणि कारंज्यातून येणाऱ्या पाण्याचा गारवा अनुभवत आहे.” पण असे अजिबात नाही.
नेमकं काय आहे प्रकरण?
व्हिडिओ नीट पाहिल्यावर लक्षात येते की हे काका कांरजा दुरूस्त करत आहे. काकांच्या हातात एक पकडही दिसत आहे जी सहसा रिपेअरिंगच्या कामासाठई वापरली जाते. त्यानंतर व्हिडिओ जस जसा पुढे जातो तसे दिसते कारंज्याला एक शिडी लावलेली आहे आणि कारज्यांच्या खाली सामानाची पिशवी देखील आहे. उन्हाचा पारा वाढतो आहे आणि उन्हाळ्यात तर तो आणखी वाढेल त्यामुळे पुणेकरांची गैरसोय होऊ नये म्हणून कारज्यांची वेळीच दुरूस्ती केली जात आहे.
पुणेकर उन्हाळ्यासाठी सज्ज
व्हिडिओ इंस्टाग्राम _bhatkanti_ek.pravas नावाच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘”काका ऑन फायर” तर व्हिडीओवर दिसणाऱ्या मजकूरमध्ये लिहिले आहे की,”पुणेकर उन्हाळ्यासाठी सज्ज झाले आहे.”