पुण्यातील कात्रज चौक गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत येत आहे. कात्रज चौकातील पुलाचे काम चौकापर्यंत आल्यानंतर काही काळासाठी ठप्प झाले होते. त्यानंतर ३ डिसेंबर पासून हे काम पुन्हा सुरू करण्यात आले ज्यामुळे या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला. या भागातील एसटी, पीएमपी, तसेच खासगी प्रवासी बस वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याची सूचना देण्यात आली. गेल्या महिन्याभरापासून हे बदल लागू करण्यात आले आहे दरम्यान कात्रज चौकात धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले आहे.
कात्रज चौकातील पुलाचे काम सुरू आहे. दरम्यान बांधकाम सुरू असलेल्या या पुलावर काही तरुण जीव धोक्यात घालून फोटोशूट करत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ चर्चेत आला आहे. कात्रज चौक हा सर्वात जास्त रहदारी असलेला भाग आहे. कात्रज चौकात पुलाचे काम सुरू असल्याने आधीच लोक जीव मुठीत घेऊन येथून प्रवास करतात. पण दुसरीकडे काही तरुण स्वत:चा जीव धोक्यात घालून पुलावर चक्क फोटोशुट करत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते आहे की, “काही तरुण पुलावर उभे राहून एकमेकांचे फोटो काढत आहे”
इंस्टाग्रामवर pune_is_loveee’s नावाच्या इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,” पुणे कात्रज चौकात ब्रिज चे काम चालू तिथे जीव धोक्यात घालून फोटोशूट करत आहेत तरुण.. काय बोलायच यांना..???”
व्हिडीओ पाहून पुणेकरांचा संताप अनावर झाला आहे. व्हिडीओवर कमेंट करत अनेकांना रोष व्यक्त केला तर काहींनी पुलावरीर तरुण तेथील कामगार असल्याचा दावा केला.
हेही वाचा –‘चिकन टिक्का चॉकलेट’ बनवणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ पाहून संतापले नेटकरी, “याला तुरुंगात टाका”
व्हिडीओवर कमेंट करताना एकाने लिहिले की,”काल मी पण बघितलं होत यांना”
दुसऱ्याने कमेंट केली की, “बरोबर आहे भाऊ बाहेरचे लोक येऊन पुण्याला खराब करतात.”