Puneri pati viral: पुणेकर त्यांच्या वैशिष्टपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात.‘तुम्हाला प्रत्येक विषयात स्वत:चे मत नसेल तर येथे प्रवेश नाही’ अशा इशार्‍यापासून ते ‘पगडीखालची खरी बुद्धिमत्ता काय असते हे पाहायचंय?’ असे आव्हान फक्त एकाच शहरात दिले जाऊ शकते, ते म्हणजे पुणे. कमीत कमी शब्दांत समोरच्याचा जास्तीत जास्त अपमान करण्याची कला पुणेकरांनाच साधली आहे, असे म्हणतात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमी चर्चेच्या विषय ठरतात. पुणेरी किस्से आणि पुणेरी पाट्या जगजाहीर आहेत. अशाच एका पुणेरी पाटीची चर्चा सध्या सगळीकडे जोरात सुरू आहे. कुणाच्याही नादाला लागा पण पुणेकरांच्या नादाला लागू नका असं म्हंटलं जातं. याचीच प्रचिती देणारी एक पुणेरी पाटी सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

पुणेकरांचा स्पष्टवक्तेपणा आणि थेट भिडण्याची वृत्ती झळकते. आपण अनेकदा पाहिलं असेल खास करुन पुण्यात घराबाहेर वेगवेगळ्या पाट्या लावलेल्या असतात, अशीच एक पाटी पुण्यात एका घराबाहेर लावली होती. या पाटीवर गेटसमोर गाडी उभी करणाऱ्यांना पुणेकर गृहस्थांनी पहिल्यांदाच एकदम प्रेमाने ताकीद दिली आहे. ही पाटी वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल.ही पाटी वाचून कोणी चूकूनही गेटसमोर पार्किंग करायची हिम्मत नाही करणार.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद; म्हणाले, “आमच्याकडे राजकारण…”
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
when abhishek Bachchan met kareena Kapoor she rolls her eyes at award show video goes viral
Video: अभिषेक बच्चन आला, करीना कपूरची गळाभेट घेतली अन् मग तिने केलं असं काही की…; व्हिडीओ होतोय व्हायरल
Nana Patekar recalls memories of smita patil
“स्मितामुळे मी सिनेमात आलो, नाहीतर…”, नाना पाटेकरांचा पहिला बॉलीवूड चित्रपट कोणता? सांगितली ४६ वर्षांपूर्वीची आठवण

आता तुम्ही म्हणाल या पाटीवर असं लिहलंय तरी काय? तर या पाटीवर “येथे ९० वर्षांचे वृद्ध पुणेकर राहतात. वेळ कधी सांगून येत नाही तरी कृपया सुज्ञ पुणेकरांनी दरवाजासमोर वाहने लावू नयेत.”

पाहा फोटो

हेही वाचा >> PHOTO: पुणेकरांचा नाद करायचा नाय! पेट्रोल पंपावर लिहली खतरनाक पुणेरी पाटी; वाचून तुम्हीही म्हणाल “जशास तसं”

हा फोटो सोशल मीडियावर न नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. अशा अनेक पुणेरी पाट्या रोज व्हायरल होत असतात. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत, एकानं म्हटलंय “पुणेकरांचा नाद नाय” तर दुसरा म्हणतो “बाप रे एवढच अजून काही”

पुणेरी पाट्या म्हणजे पुणेकरांसाठी अभिमानाचा वारसा

‘तुम्हाला प्रत्येक विषयात स्वत:चे मत नसेल तर येथे प्रवेश नाही’, अशा इशार्‍यापासून ते ‘पगडीखालची खरी बुद्धिमत्ता काय असते हे पाहायचंय?’ असे आव्हान फक्त एकाच शहरात दिले जाऊ शकते, ते म्हणजे पुणे. सुरुवातीला पेठांमध्येच असलेली पुणेरी पाटी शहर पसरले तशी संपूर्ण पुण्यात पसरली. कमीत कमी शब्दांत समोरच्याचा जास्तीत जास्त अपमान करण्याची कला पुणेकरांनाच साधली आहे असे म्हणतात. त्याचप्रमाणे कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त खवचट आशय व्यक्त करणारी पुणेरी पाटीही कोणी येरा गबाळा बनवू शकत नाही. पुणेरी पाट्या म्हणजे पुणेकरांसाठी अभिमानाचा वारसा. केवळ बुद्धिमत्ता नाही तर खास पुणेरी बुद्धीतून पाट्यांच्या माध्यमातून पुणेकरांचा स्पष्टवक्तेपणा आणि थेट भिडण्याची वृत्ती झळकते.