Bar Tender Mothers Viral Video: आई झालं की छंद वगैरे बाजूला ठेवावा लागतो असा एक समज पिढ्यान पिढ्या समाजात रुजलेला आहे. नाही म्हणायला आता त्यात बदल म्हणून वर्किंग मॉम ही संकल्पना आली. पण या बदलामुळे कामाचा पसारा आणखी वाढत गेला म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. यापूर्वी फक्त चूल मुल सांभाळणारी स्त्री आता, चूल, मुल, मीटिंग सगळं सांभाळायला लागली. बाळ झाल्यावर अनेक घरातून काम करण्यासाठी महिलेला मिळणारं प्रोत्साहन हे मुळातच “एकाचा पगार पुरणार नाही तू पण कमव” या हेतूने दिलं जातं. यासगळ्याच्या पलीकडे जाऊन बाळ झाल्यावरही आपला छंद जपून अर्थाजन करणाऱ्या फार कमी स्त्रिया आज समाजात पाहायला मिळतात. त्यातीलच एक महिला सध्या सोशल मीडियावर आपल्या तुफान टॅलेंटचे धुमाकूळ घालत आहे. कविता मेदार असे तिचे नाव असून तिचे काही व्हिडीओ सध्या ऑनलाईन व्हायरल होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कविता यांच्या सध्या व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये त्यांनी चक्क आपल्या लहान बाळाला कडेवर घेऊन आपलं काम शिकत असल्याचं दिसतंय. पुण्यातील मानिया बारटेंडिंग अकादमी येथील हा व्हिडीओ असल्याचे लक्षात येते, आपणही व्हिडीओमध्ये हे पोस्टर मागे पाहू शकता. कविता या व्हिडीओमध्ये बार टेंडिंगच्या काही ट्रिक्स करून दाखवत आहेत. त्यांच्या हातात बॉटल्स आहेत ज्या मोलोटोव्ह कॉकटेल म्हणून ओळखल्या जातात. या बॉटल्समधून वर ज्वाळा येत आहेत. कविता यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “फ्लेअर ही कला आहे, विशेषतः जेव्हा मी माझ्या बाळासह वेळ घालवत हे करू शकते.” (आपल्या माहितीसाठी, फ्लेअर म्हणजे आपल्या ग्राहकांचे मनोरंजन करण्यासाठी कॉकटेल्स बनवताना किंवा इतर वेळेस बॉटल्स, ग्लास अन्य साहित्य वापरून करायच्या करामती. )

सुरुवातीला त्या मोलोटोव्ह कॉकटेलच्या बॉटल्स आपल्या हातावर उडवून दाखवतात. नंतर ‘जगलिंग’ करतात, हे सगळं करत असताना त्यांनी सुरुवातीला बाळाला सुद्धा कडेवर घेतला होतं व नंतर बाजूला बसलेलं बाळ त्यांचं हे कसब निरखून पाहत होतं.

Video: पुणेकर आईची बातच न्यारी!

हे ही वाचा<< मुंबई लोकलमध्ये बॉडीकॉन ड्रेस घालून जनरलमध्ये चढली तरुणी; ‘तो’ लाजिरवाणा खटाटोप पाहून नेटकरी भडकले, पाहा Video

या व्हिडीओची आणखी एक खासियत म्हणजे या मध्ये कविता चक्क साडी नेसून या सगळ्या करामती करताना दिसत आहे. त्यांचा कूल अंदाज आणि बेधडक टॅलेंटपाहून नेटकऱ्यांनी मनसोक्त कौतुक केलं आहे. “हे एक आईच करू शकते” असं म्हणत अनेकांनी कविताला प्रोत्साहन दिलंय. या व्हिडीओवर चार सुख ३० हजाराहून अधिक लाईक्स आहेत विशेष म्हणजे आई असून “बाळाच्या जीवाची काळजी नाही” अशा अपेक्षित कमेंट्स यावर अजिबात नाहीत. त्यामुळे खरोखरच हा व्हिडीओ अन्य व्हायरल व्हिडीओजच्या तुलनेत वेगळा ठरत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Puneri aai bartending juggling fired cocktails wearing saree with kid in hand people say best mom ever viral video trending today svs