पुणेकरांसाठी गणेशोत्सव म्हणजे आनंद आणि जल्लोष. पुण्यातील गणेशोत्सव होऊन १० पेक्षा दिवस ओलांडले असले तरी अजूनही सोशल मीडियावर अजूनही गणेशोत्सवाचे व्हिडिओ व्हायरल होत आहे. गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक ही पुणेकरांसाठी अत्यंत खास असते. ढोल ताशा पथाकांच्या वादनावर पुणेकरांचे पाय थिरकत असतात तर डीजेच्या तालावर अनेकजण थिरकताना दिसतात. काही दिवसांपूर्वी गणेशोत्सव विसर्जन मिरवणूकीत थेट ट्रॅक्टरवर चढून नाचणाऱ्या आजींचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला होता. सध्या पुण्यातील विसर्जन मिरवणूकीत नाचणाऱ्या एका आजोबांचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहू नेटकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे.
पुणेरी आजोंबाचा डान्स व्हायरल
व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, पुण्यातील विसर्जन मिरवणूकीमध्ये तरुण उत्साह आणि जल्लोषात नाचत आहे. तरुणांच्या या जल्लोषात एक आजोबा देखील सहभागी झाले आहेत. काठीचा आधार घेऊ चालणाऱ्या या आजोबांना विसर्जन मिरवणूकीत नाचण्याचा मोह आवरला नाही. थेट स्टेजवर चढून हातातील काठी हवेत उडवत आजोबा मस्तपणे नाचत आहे. आजोंबाचा हा डान्स आणि उत्साह पाहून नेटकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू घेऊन येत आहे.
व्हिडिओ इंस्टाग्रामवर maharashtra_sound_आणि punerisoundsofficial या पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये “नाद” असे लिहिले आहे तर व्हिडीओवर पुणेरी पॅटर्न असा मजकूर लिहिलेला दिसत आहे.
येथे पाहा Viral Video
आजोबांच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून कमेंट केल्या आहेत. एकाने कमेंट करताना लिहिले की,”रुबाब हा जगण्यात असावा, वागण्यात नाही.”
दुसऱ्याने लिहिले की, “असं जगावं माणसाने मजेत, तिसरा म्हणाला, “असाच आनंद घ्या काका”