Viral Photo : पुणे हे महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय शहर आहे. दरवर्षी हजारो तरुण पुण्यात नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी स्थलांतरित होतात. विद्येचे माहेर घर असलेले पुणे ऐतिहासिक शहर म्हणून सुद्धा ओळखले जाते.
पुण्यातील प्राचीन मंदिरांपासून ऐतिहासिक वास्तुंपर्यंत, बाजारपेठांपासून खाद्यसंस्कृतीपर्यंत, अनेक गोष्टी सतत चर्चेत येतात. पुण्यातील पुणेरी पाट्यांची चर्चा तर परदेशात सुद्धा होते. तुम्ही पुण्यात अनेक पाट्या पाहिल्या असेल.

असं म्हणतात, कमीत कमी शब्दांच समोरच्याचा जास्तीत जास्त अपमान करण्याची पुणेकरांची कला तुम्हाला या पुणेरी पाटीवर लिहिलेच्या संदेशावरून दिसून येते. व्यक्त न होता आपलं मत ठामपणे आणि थेट मांडण्याचं पुणेकरांचे माध्यम म्हणजे पुणेरी पाटी.

lawrence bishnoi marathi news
सासरच्या जाचाला कंटाळलेल्या जावयानं सुटकेसाठी थेट लॉरेन्स बिश्नोईचं घेतलं नाव; पोलीसही चक्रावले!
Zeeshan Siddique slams Uddhav Thackeray
झिशान सिद्दिकींच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी दिला उमेदवार; खोचक…
झोमॅटो डिलिव्हरी बॉयने शिवीगाळ केल्याचा महिलेचा दावा; नेटकऱ्यांनी महिलेलाच केलं ट्रोल, पण का? जाणून घ्या नक्की काय घडलं?
tv serial actress arrested for kidnapping 4 year child in vasai zws
अपहृत चिमुकल्याची ४ तासात सुखरूप सुटका; टिव्ही मालिकेतील अभिनेत्रीला अटक
Vehicles of the Future, E-scoots, Self Balancing Scooters, pune,
भविष्यातील वाहने : ई-स्कूट, सेल्फ बॅलन्सिंग स्कूटर ते पॉड टॅक्सी!
businessman targeted by cybercriminals and his friend attempted to extort ₹25 lakhs
खंडणीसाठी मित्राने पातळी सोडली, झाले असे की …
thief stolen school bus Mumbai, thief jumped into drain,
मुंबई : स्कूल बस पळवणाऱ्या चोरट्याने घेतली नाल्यात उडी, आरोपी अटकेत
devendra fadnavis on women complaints
महानगरातील आव्हाने पेलण्यासाठी पोलीस दलात अत्याधुनिक सुविधा- महिलांच्या तक्रारी प्राधान्याने सोडविण्याचे गृहमंत्री फडणवीस यांचे आदेश

सोशल मीडियावर पुणेरी पाट्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक पुणेरी पाटीचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दाखवलेल्या पाटीवर एका साडी विक्रेत्याने भन्नाट मेसेज लिहिला आहे. साडी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी हा मेसेज लिहिला आहे.

हेही वाचा : ‘डान्स करताना वय नाही पाहायचं…’, ‘बहरला मधुमास नवा’ गाण्यावर चिमुकलीचा हटके डान्स अन् जबरदस्त एक्स्प्रेशन्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक

ही व्हायरल पाटी एका साडीच्या दुकानाबाहेरची आहे. या पाटीवर लिहिलेय, “कृपा सेल्समनला साडी नेसवण्याचा आग्रह करू नये. क्षमस्व”
सध्या दिवाळीच्या खरेदीसाठी लोक बाजारपेठांमध्ये गर्दी करताहेत. विशेषत:महिलावर्ग साडी खरेदी करताना दिसत आहे. अनेक साडीच्या दुकानात सेल्समन असतात. महिला अंगावर साडी कशी दिसते यासाठी त्यांना साडी नेसवण्याचा आग्रह करतात. अशा महिलांसाठी ही पाटी लावली आहे. ही पाटी वाचून तुम्हीही पोट धरून हसाल.

पाहा व्हायरल फोटो

pune_is_loveee या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला असून या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “स्थळ : रविवार पेठ , पुणे.” या फोटोवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

हेही वाचा : Indian Railway : ट्रेनच्या एसी कोचमधून प्रवास करताय का? मग तुम्हाला मिळणारी चादर, ब्लँकेट महिन्यातून किती वेळा धुतले जात माहितेय का?

यापूर्वी सोशल मीडियावर पुण्यातील अशा अनेक भन्नाट पाट्यांचे व्हिडीओ किंवा फोटो व्हायरल झाले आहे. काही दिवसांपूर्वी अशीच एक पाटी चर्चेत आली होती. त्या पाटीवर उधारी बंद आहे असे लिहिलेय होते आणि उधारी का बंद आहे त्याची काही कारणेही सांगितली होती. ती पाटी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती.