Puneri pati at Dagdusheth Halwai Ganpati 2024: मुंबई, पुण्यातसह राज्यभरात गणेशोत्सवाची धूम आणि एकच जल्लोष पाहायला मिळत आहे. अशातच घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपात लाडक्या बाप्पाचं आगमन झालं असून, बाप्पा थाटात विराजमान झाला आहे. पुण्यात मानाच्या गणपतीबरोबरच पुणेकरांचा लाडका बाप्पा म्हणजेच श्रीमंत दगडूशेठ गणपती. दगडूशेठ गणपती बाप्पाच्या दर्शनाला नेहमीच भाविकांची गर्दी असते आणि त्यात गणेशोत्सवात तर येथे दर्शनाला तुफान गर्दी असते. बाप्पाचं साजरं रूप पाहण्यासाठी भाविक गर्दी करताना दिसतात. यावेळी भाविक तासन् तास रांगेत उभे राहून बाप्पाच्या दर्शनाची आतुरतेनं वाट पाहत असतात. दरम्यान, काही असेही असतात की, जे ओळखीचा फायदा घेत, रांगेत उभं न राहता आतमध्ये जातात. अशा व्यक्तींमुळे जे तासन् तास रांगेत उभे असतात त्या भाविकांना दर्शनासाठी आणखी उशीर होतो.
VIDEO: खरा पुणेकर! ओळखीनं दर्शन घेणाऱ्या भक्तांना पुणेरी शैलीत उत्तर; दगडूशेठ मंदिराबाहेरची पुणेरी पाटी एकदा पाहाच
Viral video: तरुण दगडूशेठ हलवाई गणपती मंदीराबाहेर एक पाटी घेऊन उभा आहे, याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Written by ट्रेंडिंग न्यूज डेस्क
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 12-09-2024 at 13:16 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
TOPICSगणेशोत्सव २०२४Ganeshotsavट्रेंडिंग टूडेTrending Todayट्रेंडिंग व्हिडीओTrending Videoपुणे न्यूजPune Newsव्हायरल व्हिडीओViral Video
+ 1 More
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Puneri pati at dagdusheth halwai ganpati 2024 poster video goes viral on social media srk