Puneri pati on petrol pump: पुणेकर त्यांच्या वैशिष्टपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमी चर्चेच्या विषय ठरतात. पुणेरी किस्से आणि पुणेरी पाट्या जगजाहीर आहेत. अशाच एका पुणेरी पाटीची चर्चा सध्या सगळीकडे जोरात सुरू आहे. दरम्यान पुणेरी शैलीतली ही पाटी एका पेट्रोल पंपवर पाहायला मिळाली. याचा फोटो सध्या व्हायरल होत असून पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल एवढं नक्की.

सिगारेट आरोग्यासाठी तर हानीकारक आहेच पण पेट्रोल पंपावर सिगारेट ओढणे हे त्या व्यक्तीबरोबरच इतरांसाठीही तितकेच धोक्याचे ठरु शकते. त्यामुळेच या कारणास्तव पेट्रोल पंपावर सिगारेट ओढण्यास मनाई आहे.पेट्रोल पंप ही अतिशय संवेदनशील जागा आहे. पेट्रोल पंपाच्या परिसरात एखादी ठिणगी जरी पडली, तर मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळेच पंपावर विडी-सिगारेट पेटवण्यास, ज्वलनशील पदार्थ घेऊन येण्यास किंवा फोनवर बोलण्यास मनाई केली जाते. पण, जगात काही असेही लोकंही आहेत, जे नियम मोडून पंपावर सिगारेट ओढतात. अशाच महाभागांसाठी या पेट्रोल पंपावर ही पाटी लावली आहे. ही पाटी वाचून तुम्हीही म्हणाल पुणेकरांचा नाद नाही करायचा..

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Heart touching video of a kid crying and asking mother to come early from work emotional video viral on social media
रडत रडत तिच्याजवळ गेला अन्…, कामावर जाणाऱ्या आईला मुलाची विनवणी, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
Pune Video
पुणेकराने बनवली फॅन्सी ऑटोरिक्षा; तुम्ही कधी या रॉयल ऑटोरिक्षामध्ये प्रवास केला का? VIDEO एकदा पाहाच
pune video
“चला गोल फिरा..” ही पुणेरी पाटी कशासाठी? Video होतोय व्हायरल

आता तुम्ही म्हणाल या पाटीवर असं लिहलंय तरी काय? तर या पाटीवर “कृपया येथे धुम्रपान करु नये, तुमचा जीव स्वस्त असेल पण पेट्रोल पंप महाग आहे.” असा टोला धुम्रपान करणाऱ्यांना लगावला आहे. ही पाटी वाचून नेटकरीही म्हणत आहेत, “जशास तसं”

पाहा पुणेरी पाटी

https://www.instagram.com/reel/DC8LUh0O8Ig/?utm_source=ig_web_copy_link

पुणेरी पाट्या या अनेकदा चर्चेचा विषय बनतात. कधी वाद तयार करतात तर कधी वादावर भाष्य करतात. कधी चांगला संदेश देतात तर कधी चांगलाच संदेश पोहोचवतात. अशीच एक पुणेरी पाटी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बिना व्यक्त होता आपली मतं ठामपणे आणि थेट मांडण्याचं पुणेकरांचं माध्यम म्हणजे पुणेरी पाटी.

हेही वाचा >> “तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं स्वत:च्याच हळदीला केला तुफान डान्स; VIDEO झाला व्हायरल

पुणेरी पाट्या म्हणजे पुणेकरांसाठी अभिमानाचा वारसा

‘तुम्हाला प्रत्येक विषयात स्वत:चे मत नसेल तर येथे प्रवेश नाही’, अशा इशार्‍यापासून ते ‘पगडीखालची खरी बुद्धिमत्ता काय असते हे पाहायचंय?’ असे आव्हान फक्त एकाच शहरात दिले जाऊ शकते, ते म्हणजे पुणे. सुरुवातीला पेठांमध्येच असलेली पुणेरी पाटी शहर पसरले तशी संपूर्ण पुण्यात पसरली. कमीत कमी शब्दांत समोरच्याचा जास्तीत जास्त अपमान करण्याची कला पुणेकरांनाच साधली आहे असे म्हणतात. त्याचप्रमाणे कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त खवचट आशय व्यक्त करणारी पुणेरी पाटीही कोणी येरा गबाळा बनवू शकत नाही. पुणेरी पाट्या म्हणजे पुणेकरांसाठी अभिमानाचा वारसा. केवळ बुद्धिमत्ता नाही तर खास पुणेरी बुद्धीतून पाट्यांच्या माध्यमातून पुणेकरांचा स्पष्टवक्तेपणा आणि थेट भिडण्याची वृत्ती झळकते.

Story img Loader