Viral Puneri pati: पुणेकर त्यांच्या वैशिष्टपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमी चर्चेच्या विषय ठरतात. पुणेरी किस्से आणि पुणेरी पाट्या जगजाहीर आहेत. अशाच एका पुणेरी पाटीची चर्चा सध्या सगळीकडे जोरात सुरू आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहे. किंमती वाढल्यानं सामान्य लोकांच्या खिशावर ताण पडतोय. याच पार्श्वभूमीवर ही पाटी सध्या जोरदार व्हायरल होत आहे. दरम्यान पुणेरी शैलीतली ही पाणी पुण्यात नाहीतर चक्क अहमदनगरमध्ये पाहायला मिळाली. याचा फोटो सध्या व्हायरल होत असून पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल एवढं नक्की.
पेट्रोल पंपावर पुणेरी पाटी
अनेक दिवसांपासून लोक दिलासा मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत, मात्र पेट्रोलचे दर हे वाढतेच आहेत. सर्वसामान्यांना तर आज काय नवीन दर असा विचार करुनच धडकी भरते. याच पार्श्वभूमीवर या पेट्रोल पंप मालकानं ही पाटी लावली आहे. आता तुम्ही म्हणाल असं काय लिहलंय या पाटीवर, तर या पाटीवर “पेट्रोलचे दर स्वत:च्या जबाबदारीवर पहावेत, छातीत कळ आल्यास पंप मालक जबाबदार नाही” पेट्रोल-डिझेलचे वाढते दर पाहून खरंच एखाद्याच्या छातीत कळ येईल अशी परिस्थिती आहे. या पेट्रोल मालकानेही याच पार्श्वभूमीवर गमतीशीर पाटी लावली आहे.
पुणेरी पाटी अहमदनगरमध्ये
पेट्रोल पंपावरील कर्मचारी रसिकलाल बोरा यांनी हा बोर्ड लिहिला आहे. मागील अनेक वर्षांपासून ते पंपावर दररोज वेगवेगळे बोर्ड लिहितात. कधी सुविचार तर कधी चारोळी ते लिहितात. यातून पंपावर येणाऱ्या नागरिकांचे मनोरंजन तर होतेच, पण कधी कधी त्यांच्या जीवनाला एखाद्या सुविचाराने कलाटणी मिळते. दरम्यान, देशात महागाईनं उच्चांक गाठला आहे. इंधन दर गगनाला भिडले आहेत. पेट्रोल आणि डिझेलने कधीच शंभरी पार केली आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर भार पडत आहे.
पाहा पुणेरी पाटी
हेही वाचा >> एकीकडे पावसाचा कहर दुसरीकडे महिलांच्या किंकाळ्या अन् आरडाओरडा; ठाणे रेल्वे स्थानकात भयंकर गर्दीचा VIDEO व्हायरल
पाट्या म्हटलं की पुण्याची आठवण येते. पुणेरी पाट्या या राज्यभरातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहेत. मात्र, अहमदनगर शहरातील नेवासकर पेट्रोल पंपावर लावण्यात आलेली एक पाटी सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे.