Viral photo: आपला व्यवसाय, धंदा वाढावा, वस्तूंचा खूप खप व्हावा असे कोणत्या दुकानदाराला वाटणार नाही. यासाठी दुकानदार वेगवेगळ्या प्रकारे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पोस्टर लावतात. कोणताही व्यवसाय फायदेशीर होऊ शकतो फक्त त्याची मार्केटींग करण्याचं स्किल तुमच्याकडे हवं. तुम्ही दुकानाच्या बाहेर वेगवेगळे पोस्टर, पाट्या पाहिल्या असतील. अनेकदा बंद दुकानाबाहेरही जाहिरातीच्या पाट्या, पोस्टर लावलेले असतात. यामध्ये दुकान भाड्याने देणे आहे, गाळा भाड्याने देणे आहे. तसेच कामासाठी मुली पाहिजेत असे पोस्टर असतात. असेच एका झोरॉक्स दुकानाबाहेरची पाटी सध्या चर्चेचा विषय बनली आहे. याचा फोटोही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून झोरॉक्स दुकानाबाहेरची पाटी पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.

पुणेकर त्यांच्या वैशिष्टपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात.‘तुम्हाला प्रत्येक विषयात स्वत:चे मत नसेल तर येथे प्रवेश नाही’ अशा इशार्‍यापासून ते ‘पगडीखालची खरी बुद्धिमत्ता काय असते हे पाहायचंय?’ असे आव्हान फक्त एकाच शहरात दिले जाऊ शकते, ते म्हणजे पुणे. कमीत कमी शब्दांत समोरच्याचा जास्तीत जास्त अपमान करण्याची कला पुणेकरांनाच साधली आहे, असे म्हणतात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमी चर्चेच्या विषय ठरतात. पुणेरी किस्से आणि पुणेरी पाट्या जगजाहीर आहेत. अशाच एका पुणेरी पाटीची चर्चा सध्या सगळीकडे जोरात सुरू आहे. कुणाच्याही नादाला लागा पण पुणेकरांच्या नादाला लागू नका असं म्हंटलं जातं. याचीच प्रचिती देणारा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Viral Video
Video : जगातील सर्वात सुंदर नंबर प्लेट पाहिली का? फक्त शिवप्रेमीच याची किंमत समजू शकतो, व्हिडीओ होतोय व्हायरल
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
Phulmoni Das
Phulmoni Das: १३ तासांच्या लैंगिक यातना; ‘ती’चा मृत्यू ठरला भारतीय संमती वयाच्या कायद्यासाठी निमित्त!
Chinese Men And Women Dont Want To Get Married
‘या’ देशात तरुण-तरुणी लग्न करायला तयारच होईनात; काय आहेत कारणं?
Survey News
आज लोकसभा निवडणूक झाली तर भाजपा एनडीए ३०० पार, पंतप्रधान म्हणून कुणाला पसंती? ‘हा’ सर्व्हे नेमकं काय सांगतो?
Dhananjay Munde Pankaja Munde
धनंजय मुंडे यांच्याबद्दल पंकजा मुंडे यांच्या मनात अढी अजूनही कायम ?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Viral video See what the young boy did when he saw a woman standing with a baby in the local crowd
VIDEO: “फक्त शिक्षण नाही तर संस्कारही महत्त्वाचे” लोकलच्या भर गर्दीत बाळाला घेऊन उभ्या असलेल्या महिलेला पाहून तरुणानं काय केलं पाहा

आता तुम्ही म्हणाल, या पाटीवर असं लिहलंय तरी काय? तर या पाटीवर “कृपया दुसरीकडे काय भाव आहे आम्हास सांगू नका, क्वालिटीशी तडजोड नको” एका दुकानाच्या बाहेर ही पाटी लावल्याने लोक तिथेच जात आहेत. तसेच दुकानादाराच्या मार्केटींग आयडीयाचंही सर्वत्र कौतुक होतंय.

पाहा फोटो

पुणेरी पाट्या म्हणजे पुणेकरांसाठी अभिमानाचा वारसा. केवळ बुद्धिमत्ता नाही तर खास पुणेरी तैलबुद्धीतून पाटय़ांच्या माध्यमातून पुणेकरांचा स्पष्टवक्तेपणा आणि थेट भिडण्याची वृत्ती झळकते. आपण अनेकदा पाहिलं असेल खास करुन पुण्यात घराबाहेर वेगवेगळ्या पाट्या लावलेल्या असतात. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.  एकानं म्हंटलंय “पुणेकर काय करतील आणि कुठे आपली क्रिएटिव्हिटी दाखवतील याचा नेम नाही.” तर आणखी एकानं “पुणेकरांचा नाद नाय!” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Story img Loader