Puneri Pati Funny Video : पुण्यात गेलात आणि पुणेरी पाटी पाहिलेली नाही, असे फार क्वचितच लोक पाहायला मिळतील. पुणे आणि पुणेरी पाट्यांचे फार घनिष्ठ नाते आहे. या पुणेरी पाट्यांच्या माध्यमातून कमी शब्दांत अतिशय रंजकपणे लोकांना सूचना दिल्या जातात, जाहिरात केली जाते. सोशल मीडियावरही पुणेरी पाट्यांचे अनेक व्हिडीओ, फोटो व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर पुण्यातील एका जाहिरातीच्या पाटीचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात एका पुणेकर दुकानदाराने अशी काही जाहिरात केली आहे की पाहून तुम्हीही खूप हसाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुम्ही पुण्यात कधी फिरायला गेलात, तर तुम्हाला अनेक दुकानांबाहेर भन्नाट जाहिरातींच्या पाट्या पाहायला मिळतात. अनेकदा या पाट्यांमधून ग्राहकांना खोचकपणे सूचना दिल्या जातात किंवा अनोख्या पद्धतीने आपली जाहिरात केली जाते. या व्हायरल पाटीतून एका संगणक दुरुस्त करून देणाऱ्या दुकानदाराने अनोखी जाहिरात केली आहे.

“संगणकात प्राण भरून…”

ही पुणेरी पाटी एका चालत्या स्कुटीवर लावली आहे. बिघडलेला संगणक दुरुस्त करून मिळेल, अशा आशयाची ही जाहिरात आहे; पण त्या जाहिरातीचा ज्या पद्धतीने लिहिला आहे, ते पाहून तुम्हालाही हसू आवरणे अवघड होईल.

कारण- सरळ भाषेत सांगतील ते पुणेकर कसले, हेही पुणेरी पाटी वाचून तुम्हाला जाणवेल. आता तुम्ही म्हणाल या पाटीवर असं काय लिहिलं आहे? तर या पाटीवर, “आमच्या इथे त्राण गेलेल्या संगणकात प्राण भरून मिळेल,” असा मजकूर लिहिला आहे.

पुणेरी पाटीचा हा फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर शेअर करण्यात आला आहे, ज्यावर युजर्स वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत.

दरम्यान, सुरुवातीला पुण्यातील पेठांमध्येच अशा पुणेरी पाट्या पाहायला मिळायच्या; पण नंतर संपूर्ण पुण्यात या पाट्या प्रसिद्ध झाल्या. या पाट्यांमधून कमीत कमी शब्दांत समोरच्याचा जास्तीत जास्त अपमान करण्याची किंवा खोचकपणे समजावण्याची ही कला पुणेकरांनाच चांगली जमली आहे. त्यामुळे पुणेरी पाट्या हा आता पुणेकरांसाठी गर्वाचा विषय आहे. त्यातून पुणेकरांची थेट बोलण्याची आणि समोरच्याला कमी शब्दांत गप्प करण्याची कला दिसून येते.