Viral puneri pati : सोशल मीडियावर पुण्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. येथील ऐतिहासिक वास्तू असो किंवा खाद्य संस्कृती नेहमी चर्चेत असते.तुम्ही पुणेरी पाट्या विषयी अनेकदा ऐकले असेल किंवा वाचले असेल पुण्यात अनेक ठिकाणी पाट्या लावल्या जातात. या पाट्यांवर मिश्कीलपणे सूचना लिहिलेली असते. काही पुणेरी पाट्या इतक्या मजेशीर असतात की पोट धरून हसायला येते. सध्या पुण्यातल्या एका सिग्नलवर मोठं होर्डींग लावलं आहे. मात्र या होर्डींग पुणेरी शैलीत जी मार्केटींग केली आहे ती पाहून तुम्हीही कौतुक कराल. तर या फोटोवर लिहलेल्या ओळी वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल.
हे मार्केटिंगचे युग आहे, सर्व काही विकण्याची कला अवगत असलेला मार्केटचा राजा आहे. म्हणजे ज्याला मार्केटिंग चांगलं माहीत आहे तोच खरा मार्केटचा राजा आहे. अशा परिस्थितीत बाजारात टिकून राहण्यासाठी लोक नवीन मार्केटिंग तंत्र शोधतात. अनेकजण ग्राहकांना फसवून आपला माल विकतात. आजच्या काळात मार्केटिंग आणि जाहिरातींवर खूप पैसे खर्च करावे लागतात. त्याशिवाय कामही भागत नाही. काहीतरी वेगळं केलं तरच ग्राहक त्यांच्याकडे आकर्षित होतात.असाच वेगळा प्रयत्न करुन एका जीम मालकाने भर चौकात पुणेरी स्टाईलने भन्नाट मार्केटिंग केलीय.
आता तुम्ही म्हणाल या पोस्टरवर असं काय लिहलं आहे? तर या सिग्नलवर लावलेल्या पोस्टरवर “सिग्नल तर सुटणारच आहे!! पण सुटलेल्या पोटाचं काय?” जीमची ही भन्नाट मार्केटींग आयडीया तुम्ही याआधी कधी पाहिली नसेल. सिग्नलवरचं हे होर्डिंग वाचून तुम्हीही नक्कीच पोट धरुन हसाल.
पाहा पाटी
हेही वाचा >> Photo: आतापर्यंतची सगळ्यात भारी पुणेरी पाटी! ‘या’ ओळी विचार करायला भाग पाडतील; एकदा पाहाच
हा व्हिडिओ @NikhilSankpal9 नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत हजारो वेळा पाहिला गेला आहे. सोशल मीडिया यूजर्सनी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत होते. एका वापरकर्त्याने लिहिले…व्वा, किती आश्चर्यकारक मार्केटिंग कौशल्य आहे. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले… ‘मूर्ख बनवणे थांबवा.” तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले… जीम मालकाला २१ तोफांची सलामी दिली पाहिजे.”