Puneri Pati In Rickshaw: पुणे तिथे काय उणे, असं म्हटलं जातं. पुणेकर त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण तिरकस स्वभावामुळे चारचौघांत उठून दिसतो. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या हा नेहमीच चर्चेचा विषय ठरत आला आहे. आता हेच पाहा ना, एका रिक्षामध्ये लावलेल्या पुणेरी पाटीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पुणे म्हटलं की, अर्थात पुणेरी पाट्या लक्षात येतातच. पुणेरी पाट्या या अनेकदा चर्चेचा विषय बनतात. त्या कधी वाद निर्माण करतात, तर कधी वादावर भाष्य करतात. कधी चांगला संदेश देतात, तर कधी चांगलाच संदेश पोहोचवतात. अशीच एक पुणेरी पाटी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. व्यक्त न होता आपली मतं ठामपणे आणि थेट मांडण्याचं पुणेकरांचं माध्यम म्हणजे पुणेरी पाटी. पुणेकर त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या या नेहमी चर्चेच्या विषय ठरतात. पुणेरी किस्से आणि पुणेरी पाट्या जगजाहीर आहेत. अशाच एका पुणेरी पाटीची चर्चा सध्या सगळीकडे जोरात सुरू आहे. ही पाटी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही पाटी वाचल्यावर तुम्हीही पोट धरून हसाल.
पुण्यातल्या रिक्षातली भन्नाट पाटी
रिक्षामध्ये लावलेली पाटी वाचून तुम्हालाही हसू आवरणार नाही. आता तुम्ही म्हणाल असं लिहिलंय तरी काय? तर, अनेकदा सार्वजनिक ठिकाणी अथवा रिक्षामध्ये काही जोडपे अश्लील चाळे करतात. अशा जोडप्यांना ताकीद देणारी सूचना या पुणेरी पाटीवर लिहिली आहे. या पाटीवर रिक्षामालकानं “नमस्कार मी पुणेकर, जोडप्यांना विनंती आहे की, गाडीत कुठल्याही प्रकारचे अश्लील चाळे करू नयेत; अन्यथा पोकळ बांबूचे भरीव फटके दिले जातील” असा मजकूर या पाटीवर लिहिलेला दिसतो. बरे, फक्त मराठीतच नाही, तर इंग्रजीमध्येही या रिक्षाचालकाने पुणेरी पाटी लावली आहे. रिक्षामध्ये येणारे जाणारे सगळे लोक ही पुणेरी पाटी पाहून थांबत आहेत.
अनेकदा सार्वजनिक ठिकाणी अथवा रिक्षामध्ये काही जोडपी अश्लील चाळे करतात. त्याबद्दलचा राग जोडप्यांना ताकीद देत रिक्षामालकानं या पाटीद्वारे व्यक्त केलाय.
पाहा पुणेरी पाटी
हेही वाचा >> VIDEO: “अशी बायको प्रत्येकाला मिळो” ऋषिकेशला फिरायला गेलेल्या जोडप्यासोबत गैरप्रकार; महिलेनं काय केलं पाहाच
हा फोटो @PreetiMuch नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर नेटकरीही वेगवेगळ्या मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिले, “पुणे तिथे काय उणे.” दुसऱ्याने लिहिले, “भावा, एक नंबर.”