Viral pati: सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या गोष्टी व्हायरल होत असतात. काही फोटो व्हिडीओ आपलं मनोरंजन करतात तर काही गोष्टी अशाही समोर येतात त्या विचार करायला भाग पाडतात. दरम्यान सोशल मीडियावर अशीच एक पाटी व्हायरल होतेय जी पाहून तुम्हीही थांबून नक्की विचार कराल. पुणे म्हटलं की पुणेरी पाट्या लक्षात येतातच. पुणेरी पाट्या या अनेकदा चर्चेचा विषय बनतात. कधी वाद तयार करतात तर कधी वादावर भाष्य करतात. कधी चांगला संदेश देतात तर कधी चांगलाच संदेश पोहोचवतात. मात्र पुणेकरांचा हा फंडा आता इतर ठिकाणीही पाहायला मिळतोय. नुकतीच एक पाटी सोशल मीडियावर व्हायरल होत असून सध्या या पाटीचीच सर्वत्र चर्चा सुरु आहे.
“तुम्ही ज्या शरीराच्या जीवावर पैसा कमवता…”
आपल्याला असं वाटतं की पैसा आहे म्हणजे सगळं आहे, मात्र सगळ्या गोष्टींसाठी माणूस ठेवता येतो पण व्यायाम आपला आपल्याच करावा लागतो, त्यामुळे सर सलामत तो पगडी पचास या वाक्यानुसार व्यायाम केलात तरच शरीर तंदुरुस्त राहील आणि पैसा उपभोगता येईल. असं काय लिहलं आहे या पाटीवर? तर या पाटीवर “तुम्ही ज्या शरीराच्या जीवावर पैसा कमवता त्यालाच फिट ठेवण्यासाठी तुमच्याकडे वेळ आणि पैसा नसतो.” हे छोटसं वाक्य पण सर्वांनाच विचार करायला भाग पाडेल असं आहे. तारुण्यात स्वतःला फिट ठेवण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. म्हातारपणी आपण शारीरिकदृष्ट्या कमकुवत होऊ लागतो. त्यामुळे स्वत:ला फिट ठेवण्याचे प्रयत्नही कमी होऊ लागतात. यासाठीच तारुण्यात व्यायाम करणं गरजेचं आहे.
ही पोस्ट healthcoach_amoll नावाच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आली असून युजर्स यावर वेगवेगळ्या मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.
पाहा पाटी
हेही वाचा >> “शेवटच्या श्वासापर्यंत गेला नाही कुस्तीचा नाद” हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेल्या आजोबांचा VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
एका युजरने म्हंटलं आहे की, “दवाखान्याची पायरी चढल्यानंतर जेव्हा डॉक्टर व्यायाम करायचा सल्ला देतो तेव्हा कळत की आपण व्यायाम करायला पाहिजे होता…!” तर दुसरा युजर म्हणतो, “शरीराला जास्त कष्ट देत नाही आम्ही त्याची खूप काळजी घेतो त्याचे लाड करतो खाऊन पिऊन त्याला चांगलं ठेवतो. हे फिटनेस खुळ हल्ली आलंय पैसे कमावण्यासाठी उगाच एखादा माणूस हेल्दी दिसला की झालं अगदी सुरू बारीक व्हा, हे करा ते करा. डॉक्टरच्या वाऱ्या करा हे खाऊ नका ते खाऊ नका बारीक माणसं पण तितकेच आजारी असतात. त्यामुळे सगळ्यांनीच व्यायाम केला पाहिजे.”