Puneri pati: पुणे म्हटलं की पुणेरी पाट्या लक्षात येतातच. पुणेरी पाट्या या अनेकदा चर्चेचा विषय बनतात. कधी वाद तयार करतात तर कधी वादावर भाष्य करतात. कधी चांगला संदेश देतात तर कधी चांगलाच संदेश पोहोचवतात. अशीच एक पुणेरी पाटी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.बिना व्यक्त होता आपली मतं ठामपणे आणि थेट मांडण्याचं पुणेकरांच माध्यम म्हणजे पुणेरी पाटी. पुणेकर त्यांच्या वैशिष्टपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमी चर्चेच्या विषय ठरतात. पुणेरी किस्से आणि पुणेरी पाट्या जगजाहीर आहेत. अशाच एका पुणेरी पाटीची चर्चा सध्या सगळीकडे जोरात सुरू आहे. एक पाटी सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. ही पाटी वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणेकरांची यावेळची ही पाटी खास दारावरची बेल वाजवणाऱ्यांसाठी आहे. त्यामुळे आता ही पुणेरी पाटी वाचून घरी येणारे लोकं पुन्हा बेल वाजवण्याची हिम्मत करणार नाही एवढं नक्की.

आता तुम्ही म्हणाल या पाटीवर असं लिहलंय तरी काय? तर या पाटीवर “दारावरची पाटी – बेलसाठी लागणाऱ्या विजेचे पैसे आम्ही भरतो..एकदाच वाजवा” असं लहिलं आहे. जे लोक एकदा सोडून वारंवार दार उघडेपर्यंत बेल वाजवत राहतात अशांसाठी ही पुणेरी पाटी लावून टोमणा मारला आहे. काही लोक दार उघडेपर्यंत जराही वाट बघत नाही मात्र आता दारावरची ही पाटी वाचून घरी येणारे पाहुणे एकदाच बेल वाजवतील. या पाटीवरुन लक्षात येतं पुणेकरांकडे प्रत्येक समेस्येचा उपाय असतोच.

पाहा पुणेरी पाटी

हेही वाचा >> VIDEO: बंगळुरूमध्ये ट्रॅफिकमुळे नाही तर ‘या’ कारणामुळे फाटकावर थांबली ट्रेन; नेमकं काय घडलं पाहा

पुण्यात सुरुवातीला पेठांमध्येच असलेली पुणेरी पाटी शहर पसरत गेले तशा या पाट्या संपूर्ण पुण्यात पसरल्या. कमीत कमी शब्दांत समोरच्याचा जास्तीत जास्त अपमान करण्याची कला पुणेकरांनाच साधली आहे, असे म्हणतात. त्याचप्रमाणे कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त खवचट आशय व्यक्त करणारी पुणेरी पाटीही कोणी येरागबाळा बनवू शकत नाही. पुणेरी पाट्या म्हणजे पुणेकरांसाठी अभिमानाचा वारसा. केवळ बुद्धिमत्ता नाही, तर खास पुणेरी तैलबुद्धीतून पाट्यांच्या माध्यमातून पुणेकरांचा स्पष्टवक्तेपणा आणि थेट भिडण्याची वृत्ती दिसून येते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Puneri pati on doorbell goes viral on social media funny puneri pati goes viral on social media srk